Breaking News

IPL 2025 Updates: कोच द्रविडचे कमबॅक? युवीही करणार IPL मध्ये मेंटर म्हणून पदार्पण?

ipl 2025 updates
Photo Courtesy: X

IPL 2025 Updates: आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी सुरू झालेली आहे. लवकरच आयपीएल रिटेन्शनबाबत गव्हर्निंग कौन्सिल व संघांदरम्यान चर्चा होईल. असे असतानाच आता संघाने आपला सपोर्ट स्टाफ बदलण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. यामध्ये भारतीय संघाला टी20 विश्वचषक जिंकून देणारे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) हे आयपीएल 2025 मधून पुनरागमन करू शकतात. तसेच, भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) हादेखील प्रथमच मेंटर म्हणून आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

सध्या आयपीएलबाबत येत असलेल्या बातम्यांमध्ये विविध संघांचा सपोर्ट स्टाफ बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टी20 विश्वचषक विजेते प्रशिक्षक राहुल द्रविड हे पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्ससोबत (Rahul Dravid Rajasthan Royals) जोडले जाऊ शकतात. त्यांनी यापूर्वी राजस्थानसाठी 2011 ते 2013 यादरम्यान कर्णधार व पुढील दोन वर्ष मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. या आधी द्रविड कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासोबत जोडले जातील अशी चर्चा सुरू होती. मात्र, त्या आधीच राजस्थानने त्यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे.

यासोबतच गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाची मालकी सीव्हीसी कॅपिटल सोडण्याच्या अगदी जवळ असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे झाल्यास मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) व गुजरात टायटन्सचे क्रिकेट हेड विक्रम सोलंकी हेदेखील संघापासून दूर होऊ शकतात. त्या जागी गुजरात संघ युवराज सिंग याच्याशी मेंटर होण्यासाठी संपर्क साधत आहे, असे सूत्रांच्या हवाल्याने समजते.

आयपीएल फ्रॅंचाईजी व गव्हर्नमेंट कौन्सिल यांच्या दरम्यान 30-31 जुलै रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. यामध्ये रिटेन्शनविषयी प्रामुख्याने चर्चा होऊ शकते.

(IPL 2025 Updates Rahul Dravid May Back In IPL)