
Ira Jadhav Triple Century: महिलांच्या देशांतर्गत अंडर 19 क्रिकेट स्पर्धेत रविवारी (12 जानेवारी) मुंबई विरुद्ध मेघालय असा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईच्या 14 वर्षीय आयरा जाधव (Ira Jadhav) हिने विक्रमी त्रिशतकी खेळी केली. तिने नाबाद 346 धावा करताना अनेक विक्रम मोडीत काढले. या आर्टिकलमध्ये आपण तिच्याबद्दल जाणून घेऊया.
3⃣4⃣6⃣* runs
1⃣5⃣7⃣ balls
1⃣6⃣ sixes
4⃣2⃣ foursWatch 🎥 snippets of Mumbai batter Ira Jadhav's record-breaking knock vs Meghalaya in Women's Under 19 One Day Trophy at Alur Cricket Stadium in Bangalore 🔥@IDFCFIRSTBank | @MumbaiCricAssoc
Scorecard ▶️ https://t.co/SaSzQW7IuT pic.twitter.com/tWgjhuB44X
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 12, 2025
Ira Jadhav Triple Century In U19 Tournament
एकाच खेळीत केले इतके विक्रम
बीसीसीआय आयोजित महिलांच्या अंडर 19 वनडे स्पर्धेत मुंबई व मेघालय या सामन्यात सलामीला उतरलेल्या आयरा हिने तुफान फटकेबाजी केली. तिने अखेरपर्यंत नाबाद राहत 157 चेंडूत 346 धावा केल्या. यामध्ये 42 चौकार व 16 षटकारांचा समावेश होता. तिने या खेळी दरम्यान स्मृती मंधाना (Smriti Madhana) हिचा 224 धावांचा विक्रम मोडला. भारतातील महिला क्रिकेटमधील कोणत्याही खेळाडूची ही कोणत्याही स्तरावरील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. तसेच, पुरुषांच्या अंडर 19 क्रिकेटमध्ये देखील कोणीही ही कामगिरी करू शकले नाही.
आयरा हिने कर्णधार हर्ली गालासह दुसऱ्या विकेटसाठी 274 धावांची भागीदारी केली. तर, तिसऱ्या विकेटसाठी दीक्षा पवार हिच्यासह 186 धावा जोडल्या. हर्लीने 116 व दीक्षाने 137 धावांची खेळी केली. आयराच्या खेळीच्या जोरावर मुंबईने महिला क्रिकेट मधील कोणत्याही स्तरावरील सर्वोच्च धावसंख्या बनवली. मुंबईने 3 बाद 563 धावा बनवल्या होत्या. यानंतर मुंबईने मेघालयचा केवळ 19 धावांत खुर्दा उडवत तब्बल 544 धावांनी विक्रमी विजय मिळवला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
पुणे ते मुंबई आणि शारदाश्रमची विद्यार्थी
आयरा हिचे वडील सचिन हे डेटा ऍनालिस्ट आहेत. तर, तिची आई शिल्पा या बँकेत नोकरी करत. वयाच्या आठव्या वर्षी तिला खेळाविषयी आवड निर्माण झाली. सुरुवातीला जाधव कुटुंब पुण्यात राहत होते. मात्र, आयराच्या खेळासाठी त्यांनी 2022 मध्ये मुंबई येथे बस्तान बसवले. मुंबईत आल्यानंतर आयरा हिने कल्पना मुरकर व वैदिक मुरकर यांच्याकडे शिवाजी पार्कवर प्रशिक्षणाला सुरुवात केली. कल्पना या सचिन तेंडुलकर याचे प्रशिक्षक स्व. रमाकांत आचरेकर यांच्या कन्या आहेत.
पुढे आयरा हिला मुंबईच्या प्रसिद्ध शारदाश्रम विद्यालयात प्रवेश मिळाला. याच विद्यालयात सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी या भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी शिक्षण घेतलेले. तिच्या नावाचे स्पेलिंग ईरा असे होत असले तरी, ती स्वतः ला आयरा म्हणवून घेते. शिवाजी पार्कवर ग्लोरियस क्रिकेट क्लबकडून खेळत असताना ती तिच्या वयाच्या मुलांपेक्षा मोठे व आक्रमक फटके मारत.
ज्युनिअर ते सिनियर संघाचा जलद प्रवास
आयरा हिने आपल्या प्रतिभेने ज्युनिअर क्रिकेट ते सिनियर क्रिकेट असा प्रवास अत्यंत वेगाने केला. तिला 2023 मध्ये मुंबईच्या अंडर 15 संघात स्थान मिळाले. त्यानंतर मुंबईच्या वरिष्ठ टी20 संघात तिने नोव्हेंबर 2024 मध्ये पदार्पण केले. ती महिलांच्या राष्ट्रीय टी20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईसाठी खेळली. अंडर 19 महिला आशिया चषकासाठीच्या भारताच्या संघात तिचा समावेश केला गेला होता. मात्र, पहिल्या सामन्याच्या आधीच दुखापतग्रस्त झाल्याने तिला या स्पर्धेत खेळता आले नाही.
डब्लूपीएल व अंडर 19 महिला विश्वचषक
डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या डब्लूपीएल लिलावात तिला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. आयरा आगामी अंडर 19 महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघासह राखीव म्हणून असणार आहे. हा विश्वचषक 18 जानेवारीपासून मलेशियामध्ये खेळला जाईल.
(Ira Jadhav Triple Century In Womens Cricket)
हे देखील वाचा- Champions Trophy 2025 साठी न्यूझीलंड संघ जाहीर! दिग्गजांना डच्चू, तरूणांना संधी
Champions Trophy 2025 साठी अफगाणिस्तानची मजबूत दावेदारी, शाहिदीच्या नेतृत्वातील संघ घोषित