Breaking News

कमबॅक असावा तर असा! Ishan Kishan ने ठोकली IPL 2025 मधील पहिली सेंच्युरी, SRH 286/6

ISHAN KISHAN
Photo Courtesy: X

Ishan Kishan IPL 2025 Century: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स (SRHvRR) आमने-सामने होते. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी आपली तोडफोड फलंदाजी केली. सनरायझर्ससाठी पहिला सामना खेळत असलेल्या ईशान किशन (Ishan Kishan) याने यादरम्यान हंगामातील पहिले शतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे सनरायझर्स संघाने 286 अशी आयपील इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभी केली.

Ishan Kishan Hits First 100 Of IPL 2025

नाणेफेक गमावल्यानंतर सनरायझर्सला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. अभिषेक शर्मा व ट्रेविस हेड यांनी 3 षटकात 45 धावा केल्या. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या ईशानने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. त्याने जबरदस्त फलंदाजीचे दर्शन घडवत 45 चेंडूवर शतक पूर्ण केले. हे त्याचे पहिलेच आयपीएल शतक ठरले. तसेच तो सनरायझर्स संघासाठी पहिला सामना खेळत होता. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 47 चेंडूंमध्ये 106 धावा केल्या.

ईशान याला बेशिस्तीच्या कारणावरून भारतीय संघातून बाहेर केले गेले आहे. त्यानंतर त्याला केंद्रीय करारातून देखील वगळले गेले. मात्र, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर आयपीएल लिलावात मोठी रक्कम मिळवून तो सनरायझर्स संघात सामील झाला. आयपीएल 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

(Ishan Kishan Hits First 100 Of IPL 2025)