Breaking News

गडी काय थांबेना! 34 वे कसोटी शतक ठोकत Joe Root बनला इंग्लंड क्रिकेटचा GOAT, विराट-रोहितला…

joe root
Photo Courtesy: X/ECB

Joe Root 34 th Test Century: इंग्लंड आणि श्रीलंका (ENG vs SL) यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर पकड बनवली आहे. इंग्लंडचा सर्वात अनुभवी फलंदाज जो रूट (Joe Root) याने लॉर्ड्स येथे होत असलेल्या या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक (Joe Root 34 th Test Century) ठरले. यासह तो इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज बनला.

लॉर्ड्स कसोटीच्या या तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघाचा दुसरा डाव 251 धावांमध्ये समाप्त झाला. जो रूट याच्या व्यतिरिक्त या डावात इंग्लंडचा कोणताच फलंदाज 30 धावा करू शकला नाही. रूट याने 103 धावांची खेळी केली. त्याने पहिल्या डावात देखील शतक झळकावले होते. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक होते. यासह तो इंग्लंडसाठी आता सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने एलिस्टर कूक (Alastair Cook) याच्या 33 कसोटी शतकांचा विक्रम मोडला. पहिल्या डावात त्याने इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा बनवणारा फलंदाज होण्याचा मान मिळवलेला.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फॅब फोर नावाने ओळखल्या जाणाऱ्या चार दिग्गज फलंदाजांमध्ये देखील तो आघाडीवर गेला आहे. न्यूझीलंडच्या केन विलियम्सन व ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ यांच्या नावे प्रत्येकी 32 शतके असून, भारताच्या विराट कोहली याच्या नावे 29 शतके आहेत.

(Joe Root Hits 34 th Test Century Surpassed Alastair Cook)

हे वाचलंत का?

Joe Root च्या रडारवर Sachin Tendulkar चे 2 World Record, आणखी 5 वर्षे खेळला तर…