![ipl 2024 final kkr](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/05/ipl-2024-final-kkr.jpg)
IPL 2024 Qualifier 1| आयपीएल 2024 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) आमने सामने आले होते. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने आठ गडी राखून विजय मिळवत, अंतिम फेरीत (IPL 2024 Final) धडक मारली. तीन बळी मिळवणारा केकेआरचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) सामनावीर ठरला. केकेआर चौथ्यांदा स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल.
अंतिम सामन्यात तिकीट मिळवण्यासाठी झालेल्या या सामन्यात सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, मिचेल स्टार्क याने पहिल्या पाच षटकातच त्यांची अवस्था 4 बाद 39 अशी केली. त्यानंतर राहुल त्रिपाठी व हेन्रिक क्लासेन यांनी 62 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्रिपाठी अर्धशतक करून तर क्लासेन 32 धावांवर माघारी परतला. शेवटी कर्णधार कमिन्सने 30 धावांची खेळी केली. केकेआर साठी स्टार्कने सर्वाधिक तीन बळी टिपले.
विजयासाठी मिळालेल्या 160 धावांचा पाठलाग करताना सुनील नरीन व रहमानुल्लाह गुरबाज यांनी संघाला वेगवान सुरुवात दिली. ते दोघे बाद झाल्यानंतर व्यंकटेश अय्यर व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी नाबाद अर्धशतके ठोकून संघाला आठ गड्यांनी मोठा विजय मिळवून दिला. यासह केकेआरने 26 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. ते आता आपल्या तिसऱ्या आयपीएल विजेतेपदासाठी खेळतील.
(IPL 2024 Qualifier 1| KKR Beat SRH And Reached IPL 2024 Final)