Lockie Ferguson Four Maiden Overs:
टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी न्यूझीलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी (NZ vs PNG) असा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजी करताना पीएनजी संघाला रोखले. न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) याने थक्क करणारी विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याने थेट चारही षटके निर्धाव (Lockie Ferguson Four Maidan Overs) टाकत इतिहास रचना.
4️⃣ OVERS 4️⃣ MAIDENS 🤯
Lockie Ferguson becomes the first bowler in Men's #T20WorldCup history to bowl four maidens in a match 👏#NZvPNG | Read On ➡️ https://t.co/FAMNFlxbvi pic.twitter.com/ryUlq9BOkW
— ICC (@ICC) June 17, 2024
सुरुवातीच्या सामन्यातील सलग 2 पराभवामुळे न्यूझीलंड संघाला यापूर्वीच विश्वचषकातून बाहेर पडावे लागले होते. तुलनेने दुबळ्या असलेल्या पीएनजीविरूद्ध त्यांच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत केवळ 78 धावांमध्ये संपूर्ण संघ बाद केला. मात्र, लॉकी फर्ग्युसन याने इतिहासात नोंद होईल असा स्पेल टाकला.
लॉकी याने आपल्या 4 षटकात एकही धाव न देता सर्व षटके निर्धाव टाकली. सोबत 3 बळी देखील टिपले. टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला. मात्र, आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये यापूर्वी अशी कामगिरी झालेली आहे. सध्या कॅनडाचा कर्णधार असलेल्या साद जफर (Saad Zafar) याने पनामाविरूद्ध सर्व चार षटके निर्धाव टाकत दोन बळी मिळवले होते.
(Lockie Ferguson Bowl Four Maiden Overs In T20 World Cup 2024 Against PNG)
आम्ही चालवू पुढे वारसा! CSK विरूद्ध ऋतुराज बनला विकेटकिपर, MPL 2024 मध्ये दिसला धोनीच्या अवतारात