
Maharashtra Into Vijay Hazare Trophy 2024-25 Semi Final: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मानाची वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2024-25 (Vijay Hazare Trophy 2024-25) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जात आहेत. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्र क्रिकेट संघाने (Maharashtra Cricket Team) पंजाबचा 70 धावांनी पराभव केला. यासह महाराष्ट्राने उपांत्य फेरीत मजल मारली. युवा सलामीवीर अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) हा सामनावीर ठरला.
Maharashtra Into Vijay Hazare Trophy 2024-25 Semi Final
Maharashtra Won by 70 Run(s) (Qualified) #MAHvPUN #VijayHazareTrophy #QF3 Scorecard:https://t.co/eTrCnJbd5H
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 11, 2025
प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या महाराष्ट्र संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) केवळ पाच धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या सिद्धेश वीर याला खाते देखील खोलता आले नाही. युवा अर्शिन व अनुभवी अंकित बावणे यांनी 145 धावांची भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले. अंकितने 60 धावा केल्या. दरम्यान अर्शिन याने आपले पहिले लिस्ट ए शतक पूर्ण केले. त्याने 107 धावांची खेळी केली. यष्टिरक्षक निखिल नाईक याने केवळ 29 चेंडूंमध्ये आक्रमक 52 धावा चोपत संघाला निर्धारित 50 षटकात 275 पर्यंत मजल मारून दिली. पंजाब संघासाठी अनुभवी अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघाला सुरुवातीपासून जम बसवता आला नाही. देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक बडे खेळाडू असलेल्या पंजाब संघाचा डाव 205 धावांमध्ये समाप्त झाला. त्यांच्यासाठी नवव्या क्रमांकावर फलंदाजी करत असलेल्या अर्शदीपने 49 धावांची सर्वोच्च खेळी केली. महाराष्ट्रासाठी मुकेश चौधरी (Mukesh Chaudhary) याने तीन बळी टिपले. महाराष्ट्राची उपांत्य फेरीत विदर्भ व राजस्थान यांच्यातील विजेत्याशी गाठ पडेल. महाराष्ट्र संघ 2022-23 हंगामात या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, तमिळनाडूकडून पराभूत झाल्याने संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
(Maharashtra Into Vijay Hazare Trophy 2024-25 Semi Final)
हे देखील वाचा- प्रेरणादायी गोष्ट भारताचा कॅप्टन Pratik Waikar ची, खो-खो वर्ल्डकप 2025 गाजवायला सज्ज