
T20 Mumbai League 2025: तब्बल सहा वर्षानंतर आयोजन झालेल्या टी20 मुंबई लीग 2025 स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (12 जून) खेळला गेला. वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या या अंतिम सामन्यात सिद्धेश लाड (Siddhesh Lad) नेतृत्व करत असलेल्या मराठा रॉयल्स (Maratha Royals) संघाने विजेतेपद पटकावले. तर, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या मुंबई फाल्कन संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दोन आठवड्यात श्रेयस नेतृत्व करत असलेल्या दोन संघांना अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले आहे. मागील आठवड्यातच श्रेयस नेतृत्व करत असलेल्या पंजाब किंग्स संघाला आयपीएल अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागलेला.
Maratha Royals Won T20 Mumbai League 2025
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
बातमी अपडेट होत आहे…