Breaking News

MCA President Amol Kale Passed Away, INDvPAK सामन्यांनंतर घडली दुर्दैवी घटना

mca president amol kale passed away
Photo Courtesy: X

MCA President Amol Kale Passed Away|मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे आकस्मिक निधन झाले आहे. ते एमसीए अधिकाऱ्यांसोबत टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) पाहण्यासाठी अमेरिकेला गेले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) सामना त्यांनी न्यूयॉर्क येथे मैदानावर पाहिला. त्यानंतर रविवारी (9 जून) रात्री ही घटना घडली. त्यांच्या निधनाचे कारण कार्डीयाक अरेस्ट (Cardiac Arrest) सांगितले जात आहे.

अमोल काळे हे नुकतेच अमेरिकेला टी20 विश्वचषक पाहण्यासाठी गेले होते. रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा त्यांनी स्टॅन्डमधून आनंद घेतलेला. यावेळी त्यांच्यासोबत एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक व अपेक्स कौन्सिलचे सदस्य सुरज सामंत हे देखील होते. त्या सामन्यातील काही छायाचित्रे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेली.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव करत, एमसीए अध्यक्षपद मिळवले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी हंगामात मुंबईच्या क्रिकेटपटूंची ‌मॅच फीस दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला.

अमोल काळे हे मूळचे नागपूरचे होते. म‌ात्र, मुंबईत स्थायिक होत त्यांनी विविध व्यवसायांमध्ये हात आजमावलेला. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात. त्यांच्यात संकल्पनेतून इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) ही टेनिस बॉल क्रिकेटर्ससाठी स्पर्धा आयोजित केली गेलेली.

(MCA President Amol Kale Passed Away In New York)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *