Breaking News

आयपीएल लिलावाआधी धोनीचा हुकमी एक्का Mohit Sharma रिटायर

mohit sharma
Photo Courtesy: X

Mohit Sharma Retired From All Forms Of Cricket: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने ही घोषणा केली. आयपीएल 2026 लिलावाआधी (IPL 2026 Auction) त्याने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Mohit Sharma Retired From All Forms Of Cricket

मागील तीन हंगामात गुजरात टायटन्स संघासाठी खेळणाऱ्या मोहित याला आगामी हंगामासाठी रिटेन केले गेले नाही. लिलावात अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाजांनी असलेली कमतरता पाहता मोहित याच्यासाठी चांगली बोली लागण्याची शक्यता होती. मात्र, त्याआधीच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

हरियाणासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणारा मोहित एमएस धोनी याच्या नेतृत्वात 2013 आयपीएलमध्ये चर्चेत आला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी वनडे व टी20 खेळण्याची संधी मिळाली. टी20 विश्वचषक 2014 व वनडे विश्वचषक 2015 मध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने 26 वनडेत 31 तर 8 टी20 मध्ये 6 बळी मिळवले. आयपीएल कारकिर्दीत चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स व गुजरात टायटन्स संघासाठी खेळणाऱ्या मोहितने 120 सामन्यात 134 बळी मिळवले. आयपीएल 2014 मध्ये त्याने पर्पल कॅप जिंकली होती.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: टी20 वर्ल्डकपसाठी Indian Cricket Team Jersey लॉंच!