
MS Dhoni In ICC Hall Of Fame: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्याबाबतीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. धोनी याला आयसीसीच्या मानाच्या हॉल ऑफ फेम (ICC Hall Of Fame) खेळाडूंच्या यादीत स्थान दिले गेले.
MS Dhoni Had Inducted In ICC Hall Of Fame
आयसीसीने सोमवारी (9 जून) आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सात नव्या दिग्गजांची निवड केली. यामध्ये भारताचा एमएस धोनी, दक्षिण आफ्रिकेचे ग्रॅमी स्मिथ व हाशिम आमला, ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन व न्यूझीलंडचा डॅनियल विटोरी या पुरुष क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तर, पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीर व इंग्लंडची सारा टेलर या महिला क्रिकेटपटू देखील हॉल ऑफ फेमच्या मानकरी ठरल्या.
एमएस धोनी यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी तब्बल 16 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्याच्या नेतृत्वात भारताने टी20 विश्वचषक, वनडे विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तीनही आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे केलेल्या. तसेच, भारत कसोटी क्रमवारीतही पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. धोनी याने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली.
MS Dhoni In ICC Hall Of Fame
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।