Neeraj Chopra Manu Bhaker Marriage: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारतीय पथक सहा पदके जिंकण्यात यशस्वी ठरले. नेमबाज मनू भाकेर (Manu Bhaker) हिने दोन कांस्य पदके आपल्या नावे केली. तसेच टोकियो ऑलिंपिक्समध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याला यावेळी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, त्यानंतर आता ऑलिंपिक्स इतिहासातील भारताच्या दोन यशस्वी खेळाडूंच्या लग्नाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.
पॅरिस ऑलिंपिक्सच्या समारोप सोहळ्यासाठी मनू भाकेर ही आपली आई (Manu Bhaker Mother) सुमेधा यांच्यासह पुन्हा एकदा पॅरिसमध्ये पोहोचली होती. त्यावेळी त्यांनी नीरज चोप्रा याची भेट घेतली. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नीरज व सुमेधा या अत्यंत प्रेमळपणे संवाद साधताना दिसतायेत. यादरम्यान सुमेधा यांनी नीरज याच्याकडून डोक्यावर हात ठेवत, काहीतरी वचन घेतल्याचे बोलले जाते. यासोबतच नीरज व मनू यांचा देखील एक व्हिडिओ समोर आला असून, ते अत्यंत लाजत एकमेकांसोबत बोलत असल्याचे दिसते.
All you need is a medal in the Olympics to impress both mother and daughter.
Neeraj Chopra with Manu Bhaker and her mother. pic.twitter.com/5rDUOepyXs
— Yanika_Lit (@LogicLitLatte) August 12, 2024
या दोन व्हिडिओनंतर सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अनेकांनी याला ‘रिश्ता पक्का हुआ’ असे देखील म्हटले. तसेच, काहींनी इथे थेट लग्नाची बोलणी झाल्याचे कमेंट केले. त्यामुळे सोशल मीडियावर नीरज व मनू यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
मनू व नीरज हे दोघे देखील हरियाणाचे असून, भारताच्या सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश होत आहे. सध्या मनू केवळ बावीस वर्षांची असून, पुढील ऑलिंपिक्समध्ये तिच्याकडून सर्वांना सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. तसेच, यावेळी हुकलेले सुवर्णपदक 2018 मध्ये नीरजने आणावे अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत.
(Social Media Saying About Neeraj Chopra Manu Bhaker Marriage)
अखेर Paris Olympics 2024 संपले! वाचा कोणी जिंकले किती मेडल? भारत ‘या’ स्थानी