Breaking News

कमिन्सने पुन्हा दाखवला क्लास! घेतली T20 World Cup 2024 मधील पहिली हॅट्रिक

t20 world cup 2024
Photo Courtesy: Cricket,co,au

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये चौथा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (AUS vs BAN) असा खेळला गेला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार 28 धावांनी विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याने हॅट्रिक (Pat Cummins Hat-trick) मिळवली. या विश्वचषकात हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला.

सुपर 8 च्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी नियमित अंतराने बळी मिळवत बांगलादेशच्या मोठ्या धावसंख्येच्या अपेक्षांना सुरूंग लावला. यानंतर अठराव्या षटकातील पाचव्या चेंडूवर कमिन्स याने महमदुल्लाह याला त्रिफळाचित केले. तर, पुढच्याच चेंडूवर त्याने मेहदी हसनला झेलबाद करत तंबूत पाठवले. यानंतर अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने तौहिद ह्रदय याला बाद करत आपली हॅट्रिक पूर्ण केली.

या विश्वचषकातील ही पहिली हॅट्रिक ठरली. तसेच, ऑस्ट्रेलियासाठी टी20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी 2007 टी20 विश्वचषकात ब्रेट ली याने बांगलादेशविरुद्धच हॅट्रिक पूर्ण केलेली. तर, ऑस्ट्रेलियासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऍश्टन एगरने 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध व नॅथन एलिस याने 2021 मध्ये बांगलादेशविरुद्ध हॅट्रिक मिळवली होती.

(Pat Cummins Took First Hattrick Of T20 World Cup 2024)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *