Breaking News

कमबॅकसाठी 25 वर्षांच्या Prithvi Shaw ने घेतला मोठा निर्णय

PRITHVI SHAW
Photo Courtesy: X

Prithvi Shaw Seeks NOC From MCA: भारतीय क्रिकेट संघासाठी खेळलेला मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी पृथ्वी मुंबई क्रिकेटमधून बाजूला जाऊ इच्छितो. यासाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितले आहे.

Prithvi Shaw Wants To Join Maharashtra

पृथ्वी त्याने लहानपणापासून मुंबई क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. वयोगट क्रिकेटपासून तो मुंबई संघाचाच भाग राहिलाय. मात्र, मागील काही वर्षांपासून त्याची कामगिरी अपेक्षित अशी झाली नाही. त्यामुळे त्याला मुंबई संघातून वगळण्यात देखील आलेले. पृथ्वी याला संघात पुनरागमन करायचे असल्यास, वजन कमी करावे लागेल, असे एमसीएच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते.

सध्या पृथ्वी याने एमसीएकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. तो आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामात महाराष्ट्र संघासाठी खेळण्याची शक्यता आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ईगल नाशिक टायटन्स बनली MPL 2025 चॅम्पियन! रायगड रॉयल्स फायनलमध्ये पराभूत