
Solapur Smashers Won WMPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित पहिल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 (Womens Maharashtra Premier League 2025) स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (14 जून) खेळला गेला. या अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स (Pune Warriors) संघाने एका धावेने थरारक विजय मिळवला. पुण्याची कर्णधार अनुजा पाटील (Anuja Patil) सामन्याची नायिका ठरली.
Pune Warriors Won WMPL 2025
प्रथमच झालेल्या या स्पर्धेत चार संघानी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 18 षटकात 129 अशी सन्मानजनक मजल मारली होती. पुणे संघासाठी कर्णधार अनुजा पाटील हिने सर्वाधिक 30 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुक्ता मगरे व शाल्मली क्षत्रिय यांनी शानदार खेळ दाखवत सोलापूर स्मॅशर्सला विजयाच्या जवळ आणले. मात्र, अखेरच्या षटकात अनुजा पाटील हिने 9 धावांचा बचाव करत आपल्या संघाला विजयी केले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा- Story Of Temba Bavuma: 27 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेला चोकर्स ते चॅम्पियन बनवणारा टेंबा बवुमा