Breaking News

R Ashwin Century: अश्विनच चेन्नईचा ‘थाला’! बांगलादेशची गोलंदाजी फोडत ठोकले धुवाधार शतक, भारत ड्रायव्हिंग सीटवर

R ASHWIN CENTURY
Photo Courtesy: X/BCCI

R Ashwin Century: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारी (19 सप्टेंबर) सुरुवात झाली. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात, भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू आर अश्विन (R Ashwin) याने पहिला दिवस गाजवला. भारतीय संघ अडचणीत असताना त्याने आपल्या घरच्या मैदानावर शानदार शतक (R Ashwin Century) झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 6 वे शतक ठरले.

(R Ashwin Century)

भारतीय संघाचे सर्व प्रमुख फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. यशस्वी जयस्वाल वगळता इतरांना अर्धशतक करण्यात अपयश आले. संघ 6 बाद 144 अशा नाजूक परिस्थितीत असताना अश्विन व रवींद्र जडेजा या अनुभवी जोडीने डाव सावरला. त्यांनी पहिल्या दिवसाखेर 150 धावांची भागीदारी करून संघाला सावरले. अश्विन याने आपल्या घरच्या मैदानावर ठोकलेले हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध येथे शतक झळकावण्याची कामगिरी केलेली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 6 बाद 339 धावा केल्या होत्या. अश्विन नाबाद 102 तर जडेजा 86 धावा काढून खेळत आहे.

तत्पूर्वी, भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, भारताची आघाडीची फळी स्वस्तात तंबूत परतली. कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली प्रत्येकी सहा धावा करून बाद झाले. तर, शुबमन गिल याला खातेही खोलता आले नाही. भारत 3 बाद 34 अशा स्थितीत असताना यशस्वी जयस्वाल व रिषभ पंत यांनी अर्धशतकीय भागीदारी करत संघाचा डाव सावरला. चांगल्या लयीत दिसणारा रिषभ दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला 39 धावांवर बाद झाला. केएल राहुल याला देखील मोठी खेळी करता आली नाही व 16 धावांमध्ये तो माघारी परतला. यशस्वी जयस्वाल याने 56 धावांची निर्णायक खेळी केली. बांगलादेशसाठी हसन महमूद याने सर्वाधिक चार बळी मिळवले.

(IND v BAN R Ashwin Century In Chennai Test)

IND v BAN: टॉप 3 च्या हाराकिरीनंतर रिषभ-जयस्वालने सावरले, पहिले सत्र बांगलादेशच्या नावे