Breaking News

अश्विनने निवडली All Time IPL 11, चकित करणारी नावे सामील, भारतीय दिग्गजांनाच डच्चू

All time ipl 11
Photo Courtesy: X

R Ashwin All Time IPL 11: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याने नुकताच आपली सर्वोत्तम आयपीएल इलेव्हन (All Time IPL 11) जाहीर केली आहे. के श्रीकांत (K Srikkanth) यांच्याशी गप्पा मारताना त्याने आपला संघ घोषित केला.

के श्रीकांत यांच्या ‘चिकी चिका’ या यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विन याने आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम 11 आयपीएल खेळाडूंचा संघ घोषित केला. या संघात सलामीची जोडी म्हणून त्याने विराट कोहली व रोहित शर्मा यांची निवड केली. विशेष म्हणजे हे दोघे आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात पहिल्या दोन स्थानी आहेत. अश्विनच्या संघात मधल्या फळीची जबाबदारी मि. आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना, भारताचा विद्यमान टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव व दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हीलियर्स यांच्याकडे दिली आहे. तर, संघाचा कर्णधार व यष्टिरक्षक म्हणून एमएस धोनी याची निवड केली.

या संघात फिरकी गोलंदाजीची बाजू सुनील नरीन व राशीद खान हे विदेशी फिरकीपटू सांभाळतील. तर, तीन वेगवान गोलंदाज म्हणून त्याने लसिथ मलिंगा, भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांची निवड केली.

या संघात अनेक दिग्गजांचा समावेश केला गेलेला नाही. विदेशी सलामीवीर म्हणून स्पर्धेत नाव कमावलेला वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, वेस्ट इंडिजचेच कायरन पोलार्ड व ड्वेन ब्राव्हो या संघाचा भाग नाहीत. तसेच, स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज असलेला भारताचा क्रिकेटपटू असलेला भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा देखील या संघात जागा बनवण्यात अपयशी ठरला. या व्यतिरिक्त भारताचे झहीर खान, अमित मिश्रा व हार्दिक पंड्या हे देखील या संघाचा भाग नाहीत.

(R Ashwin Picks All Time IPL 11)

एकदम ‘झॅक’स! Zaheer Khan च्या खांद्यावर मोठी जबाबदारी, या निर्णयाचे होतेय कौतुक