![rahul chaudhari](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/rahul-chaudhari.jpg)
Rahul Chaudhari Kabaddi: भारताचा अनुभवी कबड्डीपटू राहुल चौधरी (Rahul Chaudhari) याने व्यावसायिक कबड्डीमधून निवृत्त (Rahul Chaudhari Retirement) होण्याचे संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेश येथील एका कार्यक्रमात बोलताना त्याने याविषयी भाष्य केले.
राहुल चौधरी याने या कार्यक्रमावेळी बोलताना आपल्या कारकीर्दीतील काही आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी आपल्या निवृत्तीविषयी बोलताना तो म्हणाला,
“प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीतील एक अतिशय उच्च आणि सुवर्ण काळ असतो. मी 2010 पासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळतोय. तसेच 2014 पासून सातत्याने प्रो कबड्डी लीग खेळलेली आहे. प्रत्येक खेळाडूला कारकिर्दीत कधीतरी मागे यावे लागते. पीकेलएल 11 (PKL 11) मध्ये मी दोन-तीन खेळेल किंवा पूर्ण हंगाम खेळेल. मात्र, त्यानंतर मी थांबण्याचा विचार केला आहे.”
राहुल हा पीकेएल 1 मधील सर्वात यशस्वी रेडर ठरलेला. त्यानंतर त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. कबड्डीचा ‘शो मॅन’ म्हणून त्याला नाव दिले गेलेले. सुरुवातीला तेलगू टायटन्स संघासाठी त्याने सहख हंगाम खेळले. त्यानंतर तमिल थलायवाज व पुणेरी पलटणसाठी त्याने एक-एक हंगाम खेळला. सध्या तो जयपुर पिंक पँथर्स संघासाठी खेळतो.
उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथील रहिवासी असलेल्या 31 वर्षीय राहुलने भारतासाठी कबड्डी विश्वचषक तसेच एशियन गोल्ड मेडल देखील जिंकले आहे. यासोबतच तो भारतीय संघाचा कर्णधार देखील राहिलेला.
(Rahul Chaudhari Hits Retirement From Kabaddi)