India Win T20 World Cup 2024 :- अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है… असंच काहीसं भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Indian Captain Rohit Sharma) बाबतीत घडलं. ज्या टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयाचं स्वप्न 140 कोटी भारतीयांनी गेल्या 17 वर्षांपासून पाहिलं होतं, ते अखेर काल (29 जून) पूर्ण झालं. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने बार्बाडोसच्या मैदानावरील टी20 विश्वचषक 2024 अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत ट्रॉफी जिंकली. यासह कर्णधार रोहितचे 11 वर्षांपासूनचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.
2013 साली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि तेव्हापासून हा संघ आयसीसी विजेतेपदासाठी झगडताना दिसत होता. पण बार्बाडोसमध्ये टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 बाद 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 8 बाद 169 धावाच करू शकला आणि अशाप्रकारे भारताने विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.
बारबाडोस में तिरंगा गाड़ दिया.
जय हिन्द! 🇮🇳
@JayShah | @ImRo45 | @hardikpandya7 #TeamIndia pic.twitter.com/C4lfuhXrDt— BCCI (@BCCI) June 30, 2024
भारताच्या विजयानंतर कर्णधार रोहित भावूक झाला. त्याने बराच वेळ बार्बाडोसच्या खेळपट्टीकडे पाहिले आणि नंतर तो बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती खाताना दिसला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आयसीसीने या भावनिक क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती खाताना दिसत आहे. रोहित शर्माच्या या हृदयस्पर्शी व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आह. विशेष म्हणजे, यानंतर रोहितने बार्बाडोसच्या मैदानावर तिरंगा फडकावला. यावेळी उपकर्णधार हार्दिक पांड्या आणि बीसीसीआय सचिव जया शहाही तिथे होते.
View this post on Instagram
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।