Breaking News

Rohit Sharma ची कसोटी कारकीर्द समाप्त? कोच गंभीरचे सूचक वक्तव्य, म्हणाला..

rohit sharma test
Photo Courtesy; X

Rohit Sharma Test Carrier: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या दरम्यानचा पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनी (Sydney Test) येथे खेळला जाणार आहे. सामन्याच्या आदल्या दिवशी भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांच्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक गोष्टी पाहायला मिळाल्या. गंभीर यांच्या वक्तव्यावरुन भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला या सामन्यातून वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय संघ या मालिकेत सध्या 2-1 असा पिछाडीवर आहे. अखेरची कसोटी जिंकून भारत मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी, गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला अखेरच्या कसोटीत संधी मिळणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गंभीर म्हणाले, “खेळपट्टी पाहून आम्ही अंतिम ११ खेळाडूंची निवड करू” त्यांच्या या उत्तराचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कर्णधार असला तरी, रोहितची या सामन्यासाठी जागा पक्की नसल्याचे स्पष्ट झाले.

पाचव्या सामन्याआधीच्या एकमेव सराव सत्रात रोहित अगदी कमी वेळ फलंदाजीचा सराव करताना दिसला. तसेच, त्याने स्लीपमधील क्षेत्ररक्षणाचा सरावही केला नाही. या सराव सत्रात अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी स्लीपमध्ये झेल घेताना दिसला. तसेच, स्टॅंडमध्ये गंभीर, रोहित व उपकर्णधार जसप्रीत बुमराह हे बराच वेळ चर्चा करताना दिसत होते. या सर्व घटनांवरून रोहित अखेरचा सामना खेळण्याची शक्यता कमी दिसते.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

रोहित याची कामगिरी या मालिकेत अगदीच खराब राहिली आहे. त्याने खेळलेल्या तीन सामन्यात केवळ 25 धावा केल्या असून, भारताला चांगली सलामी देण्यात त्याला अपयश आले. तसेच, नेतृत्वात देखील रोहित चमक दाखवू शकला नाही. रोहित या सामन्यात न खेळल्यास तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र न झाल्यास भारताला आपला पुढील कसोटी सामना थेट जुलै महिन्यात खेळायचा आहे.

(Rohit Sharma Might Dropped From Sydney Test)

हे देखील वाचा- भारतीय फलंदाजीची हाराकिरी ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर! Melbourne Test जिंकत यजमानांची मालिकेत 2-1 आघाडी