Breaking News

“मला कल्पनाच नव्हती”, 2023 ODI World Cup Final च्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलला रोहित, पत्नी रितिकाला…

2023 odi world cup final
Photo Courtesy:X

2023 ODI World Cup Final| भारतीय क्रिकेट संघाला मागील वर्षी झालेल्या ‌वनडे विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला होता. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असताना भारतीय संघाला घरच्या मैदानावर पराभूत व्हावे लागलेले. त्यानंतर आता जवळपास सात महिन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रतिक्रिया दिली आहे.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघ फक्त 240 धावा करू शकलेला. त्यानंतर 47 धावांवर 3 गडी बाद झाल्यानंतरही ट्रेविस हेड याने शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. भारतीय क्रिकेट चाहते त्या दिवसानंतर आजही त्या आठवणी विसरू शकले नाहीत. असे असतानाच कर्णधार रोहित शर्मा याने भारतीय संघाला पुरस्कृत करणाऱ्या कंपनीला एक मुलाखत दिली. त्याने त्या अंतिम सामन्याविषयी बोलताना म्हटले,

“जेव्हा मी दुसऱ्या दिवशी झोपेतून उठलो, तेव्हा मला काहीच कल्पना नव्हती की रात्री काय घडले. उठल्यानंतर मी माझ्या पत्नीला म्हणालो काल जे काही घडले ते एक वाईट स्वप्न होते ना? मला असे वाटत होते की, अंतिम सामना दुसऱ्या दिवशी आहे. आपण पराभूत झालो आहोत हे समजण्यासाठी मला दोन-तीन दिवस जावे लागले. पुढच्या संधीसाठी आणखी चार वर्षे वाट पाहावी लागणार हे मला समजून गेले.”

भारतीय संघ 2013 नंतर अद्याप एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. सध्या भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात टी20 विश्वचषक खेळत आहे. भारताने आयर्लंडविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे.

(Rohit Sharma Speaks On 2023 ODI World Cup Final)

4 comments

  1. Thank you a bunch for sharing this with all folks you really recognize what you are talking approximately! Bookmarked. Kindly additionally seek advice from my site =). We can have a hyperlink exchange agreement among us!

  2. It’s in point of fact a great and useful piece of info. I am glad that you simply shared this helpful info with us. Please keep us up to date like this. Thank you for sharing.

  3. I was examining some of your content on this site and I believe this website is very informative ! Keep on putting up.

  4. Hiya! I simply wish to give a huge thumbs up for the good info you could have right here on this post. I can be coming again to your blog for more soon.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *