Breaking News

धक्कादायक! Saina Nehwal चा झाला घटस्फोट, 7 वर्षांचे नाते संपले

saina nehwal
Photo Courtesy: X

Saina Nehwal Announced Divorce: भारताची सर्वात अनुभवी आणि ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने एक मोठा निर्णय घेतला आहे. साईनाने आपला पती व माजी बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) याच्यापासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. दोघांच्या संमतीने हा निर्णय घेतल्याचे, तिने सोशल मीडिया पोस्ट करत सांगितले. दोघांचा विवाह डिसेंबर 2018 मध्ये झाला होता.

Saina Nehwal Divorce

भारतीय बॅडमिंटनला नवी ओळख देणाऱ्या साईनाने रविवारी सोशल मीडिया पोस्ट करत आपल्या घटस्फोटाची घोषणा केली. रविवारची रात्री उशिरा केलेले या पोस्टमध्ये तिने म्हटले, ‘आयुष्यात कधी कधी वेगळ्या वाटा निवडाच्या असतात. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंतच्या आठवणींसाठी आणि दिलेल्या सन्मानासाठी धन्यवाद’

साईना व कश्यप हे जुनियर गटापासून हैदराबाद येथील एकाच अकादमीत प्रशिक्षण घेत होते. साईना हिने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. तसेच ती जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर देखील पोहोचलेली. दुसरीकडे, कश्यप हा देखील भारताचा क्रमांक एकचा बॅडमिंटनपटू राहिला आहे. त्याने 2023 मध्ये निवृत्ती जाहीर करत प्रशिक्षक म्हणून दुसरी इनिंग सुरू केली होती. या जोडप्याने 2018 मध्ये विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: चेल्सीने उंचावला FIFA Club World Cup 2025! पीएसजीची अंतिम सामन्यात सपशेल शरणागती