![shikhar dhawan retirement](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/08/shikhar-dhawan-retirement.jpg)
Shikhar Dhawan Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट व देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शनिवारी (24 ऑगस्ट) एक व्हिडिओ शेअर करा त्याने ही माहिती दिली. यासह तब्बल दोन दशकांची त्याची देशांतर्गत क्रिकेटची व 13 वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द समाप्त झाली. असे असले तरी, तो अद्याप आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे (Shikhar Dhawan Retirement).
SHIKHAR DHAWAN RETIRED FROM INTERNATIONAL CRICKET….!!!!
– An Icon of Indian Cricket, Thank you for the memories 🇮🇳 pic.twitter.com/xPC6kCXEGw
— Johns. (@CricCrazyJohns) August 24, 2024
आयपीएल 2024 च्या समाप्तीनंतर शिखर याने निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यावर आता त्याने शिक्कामोर्तब केले. शिखर याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले, ” नमस्कार, आज मी एका अशा वळणावर उभा आहे, येथून मागे पाहिल्यावर फक्त आठवणीच दिसून येतात आणि पुढे पाहिल्यावर संपूर्ण जग. माझे एकच ध्येय होते ते म्हणजे भारतासाठी खेळले. ते पूर्ण झाले. प्रवासासाठी मी अनेकांचा आभारी आहे. सर्वात आधी माझे कुटुंब, प्रशिक्षक तारिक सिन्हा, मदन शर्मा व माझा संपूर्ण संघ. मी त्यांच्यासोबत अनेक वर्ष खेळलो. तिथे मला एक कुटुंब मिळाले, ओळख मिळाली आणि तुम्हा सगळ्यांचे प्रेम मिळाले.”
तो पुढे म्हणाला, “प्रत्येक कहाणीमध्ये पुढे जाण्यासाठी पाने पलटावी लागतात. मी तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट व देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. इथे थांबत असताना माझ्या हृदयात एक भाव आहे की मी खूप खेळलो. त्यासाठी डीडीसीए व बीसीसीआय यांचा आभारी राहील. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी तुमचे आभार. माझ्या मनात असे कधीच राहणार नाही की मी पुढे खेळणार आहे. फक्त हेच राहील की मी देशासाठी खेळलो.”
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
धवन याने 2004-2005 मध्ये दिल्लीसाठी देशांतर्गत खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी 2011 पर्यंत वाट पाहावी लागली. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने वनडे पदार्पण केले होते. यानंतर त्याने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने भारतासाठी 34 कसोटी सामने खेळताना 2315 धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये 167 सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली. यामध्ये त्याने 6793 धावा काढल्या. तसेच 68 टी20 सामन्यात 1759 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. आयसीसी स्पर्धांमध्ये त्याने नेहमीच विशेष कामगिरी केली.
(Shikhar Dhawan Retirement From International Cricket)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।