Breaking News

सर वेस हॉल यांची Virat Kohli च्या पाठीवर कौतुकाची थाप, म्हणाले “आता 100 शतके…”

VIRAT KOHLI
Photo Courtesy: X/Vikrant Gupta

Virat Kohli:

टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहे. भारत आपले सुपर 8 सामने वेस्ट इंडिज येथेच खेळेल. आपल्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ बार्बाडोसमध्ये सराव करत आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर वेस हॉल (Sir Wesley Hall) यांनी भारतीय संघाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी विराट कोहली (Virat Kohli) याचे तोंडभरून कौतुक केले.

भारत अफगाणिस्तानविरुद्ध 20 जून रोजी आपला पहिला सुपर 8 सामना खेळणार आहे. हा सामना बार्बाडोस येथे होईल. मंगळवारी भारतीय संघाच्या सराव सत्रादरम्यान सर वेस हॉल यांनी भारतीय संघाला भेट दिली. सध्या 86 वर्षाच्या असलेल्या हॉल यांनी यादरम्यान भारतीय खेळाडूंच्या भेटी घेतल्या. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांना त्यांनी आपले ‘अन्सरींग द कॉल’ हे आत्मचरित्र भेट दिले. तसेच आपल्याला भारतात खूप प्रेम मिळाल्याची कबुली त्यांनी राहुल द्रविड यांच्याकडे दिली.

यादरम्यान विराट यांच्यासोबत त्यांनी छोटेखानी संवाद साधला. विराटचे कौतुक करताना ते म्हणाले,

“मी जगातील अनेक महान खेळाडूंना खेळताना पाहिले आहे. तू नक्कीच त्यापैकी एक आहेस. मी आत्तापर्यंत तुझी कारकीर्द पाहिली असून, तुझे आकडे देखील माहित आहेत. आता आणखी काही शतके बनवत 100 शतके पार कर.”

त्यावर विराटने त्यांना हसून हो असे प्रत्युत्तर दिले. विराटच्या नावावर सध्या 80 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. यामध्ये 50 वनडे, 29 कसोटी व एका टी20 शतकाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके भारताच्या सचिन तेंडुलकर यांनी झळकावली आहेत.

(Sir Wesley Hall Praised Virat Kohli)

मोठी बातमी| Kane Williamson कर्णधारपदावरून पायउतार! करारही नाकारला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे भवितव्य अधांतरी

7 comments

  1. What¦s Happening i am new to this, I stumbled upon this I’ve found It absolutely useful and it has helped me out loads. I am hoping to give a contribution & assist different users like its aided me. Great job.

  2. Tissue composition of mammographically dense and non dense breast tissue, Breast Cancer Res Treatment 131 2012, 267 275 where to buy priligy

  3. L’application 888 starz est compatible avec tous les appareils.

  4. Android ?шін 888starz apk о?ай ж?не тегін орнатылады.

  5. Kazino o‘yinlari va sportga stavkalar qilishni istaysizmi? Unda 888starz rasmiy ilovasini yuklab oling. Ushbu dastur yuqori darajadagi xavfsizlik va qulay interfeysni ta’minlaydi. Hoziroq yuklab olib, o‘yin dunyosiga qo‘shiling.

  6. Les joueurs au Burkina Faso peuvent explorer une experience immersive et securisee sur le site officiel 888starz. Ce site propose des jeux de haute qualite, des promotions attractives et un support client dedie, garantissant ainsi une satisfaction totale pour tous les amateurs de jeu en ligne dans la region.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *