Breaking News

VIDEO: दिव्यांग मुलीसाठी Smriti Mandhana चे स्पेशल गिफ्ट, कौतुकाचा होतोय वर्षाव, पाहा व्हिडिओ

smriti mandhana
Photo Courtesy: X/ Star Sports

Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेत महिला आशिया चषक (Womens Asia Cup) स्पर्धा खेळत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा (INDW vs PAKW) सात गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने 40 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र, त्यानंतर तिने केलेल्या एका कृतीने सर्वांचे मन जिंकले (Smriti Mandhana Gift To Physically Challenged Girl).

भारतीय संघाने पाकिस्तानला एकतर्फी हरवत स्पर्धेत विजयी सुरुवात केली. स्मृतीने शफाली वर्मासह 85 धावांची भागीदारी करताना संघाच्या विजयाची पायाभरणी केली. भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवल्यानंतर इतर खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये असताना स्मृतीने मैदानात एक मन जिंकणारी कृती केली. मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या एका दिव्यांग मुलीची तिने भेट घेतली. सोबत बराच वेळ तिच्याशी गप्पाही मारल्या. यासोबतच तिने त्या मुलीला एक मोबाईल देखील भेट म्हणून दिला.‌ तसेच, जाण्यापूर्वी त्या मुलीसोबत छायाचित्र देखील काढले.

स्मृतीने 18 जुलै रोजी आपला 28 वा वाढदिवस साजरा केला. सध्या स्मृती शानदार फॉर्ममध्ये असून, तीने सातत्याने धावा काढल्या आहेत. वुमेन्स प्रीमियर लीग जिंकल्यानंतर तिने भारतीय संघासाठी देखील आपला फॉर्म दाखवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत तिच्या बॅटमधून दोन शतके आली. यासोबतच कसोटी मालिकेतही तिने एक शतक झळकावले.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा विचार केल्यास दीप्ती शर्मा, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकार व श्रेयंका पाटील यांनी योगदान देत पाकिस्तानचा डाव केवळ 108 धावांवर संपवला होता. त्यानंतर स्मृती व शफाली यांनी 85 धावांची भागीदारी करत भारताचा विजय सोपा केला. भारतीय संघासमोर या स्पर्धेत विजेचेपद राखण्याचे आव्हान असेल.

(Smriti Mandhana Gifts Mobile To Physically Challenged Girl)

टीम इंडियाने पुन्हा उडवला पाकिस्तानचा धुव्वा! Womens Asia Cup मध्ये ‘हरमन’सेनेची विजयी सलामी