
Smriti Mandhana Hits Fastest ODI Century For India: भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (INDW vs AUSW) यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 413 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने ऐतिहासिक फटकेबाजी केली. अवघ्या 50 चेंडूंमध्ये शतक ठोकत तिने भारतासाठी महिला वनडेतील सर्वात वेगवान शतक झळकावले.
First #TeamIndia batter to score back-to-back ODI hundreds twice in women's cricket 🔥
Exemplary batting from Smriti Mandhana 🙌
Updates ▶️ https://t.co/Z0OmZGVfVU#INDvAUS | @IDFCFIRSTBank | @mandhana_smriti pic.twitter.com/6tGBaqkAme
— BCCI Women (@BCCIWomen) September 20, 2025
Smriti Mandhana Hits Fastest ODI Century For India
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 412 अशी मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियासाठी अनुभवी बेथ मूनीने 75 चेंडूंमध्ये 138 धावांची खेळी केली. तर एलिस पेरी व जॉर्जिया होल यांनी अनुक्रमे 68 व 81 धावांचे योगदान दिले. भारतासाठी अरुंधती रेड्डीने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना भारतासाठी स्मृतीने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तिने सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर आक्रमण करत 23 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. हे भारतासाठी महिला वनडेतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. त्यानंतर तिने आपले आक्रमण सुरूच ठेवत 50 चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घातली. हे भारतासाठी पुरुष व महिला वनडे क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक ठरले. बाद होण्यापूर्वी तिने 63 चेंडूंमध्ये 125 धावांची खेळी केली. यामध्ये 17 चौकार व पाच षटकारांचा समावेश होता.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: इकडे नबीने Dunith Wellalage ला 5 षटकार मारले, तिकडे वडिलांचे हार्ट अटॅकने निधन झाले