Breaking News

Asia Cup 2025 मध्ये सूर्याने उडवली रोहितची खिल्ली, व्हिडिओ झाला व्हायरल

asia cup 2025
Photo Courtesy; X

Suryakumar Yadav Tease Rohit Sharma In Asia Cup 2025: आशिया कप 2025 च्या अखेरच्या साखळी सामन्यात भारत ओमानविरूद्ध मैदानात उतरला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, नाणेफेकीवेळी त्याने भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा याची खिल्ली उडवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Suryakumar Yadav Tease Rohit Sharma In Asia Cup 2025

तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार याला भारतीय संघात काय बदल आहे असे विचारले. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “संघात दोन बदल आहेत. हर्षित राणा आणि” इतके बोलल्यानंतर तो थांबला आणि त्याला दुसऱ्या खेळाडूचे नाव आठवले नाही. त्याने आणखी वेळ घेतला मात्र अखेरपर्यंत त्याला त्या खेळाडूचे नाव माहित पडले नाही. त्यावेळी तो बोलताना म्हणाला, “मी रोहित शर्मा झालोय वाटते.” त्यानंतर रवी शास्त्री हे देखील हसू लागले. विशेष म्हणजे सूर्यकुमारनंतर ओमानचा कर्णधार देखील आपल्या खेळाडूंची नावे विसरला.

रोहित शर्मा अनेकदा नाणेफेकीवेळी संघातील बदल विसरून जातो. यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची मस्करी होत असते.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: इकडे नबीने Dunith Wellalage ला 5 षटकार मारले, तिकडे वडिलांचे हार्ट अटॅकने निधन झाले