
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शुक्रवारी (14 जून) इंग्लंड आणि ओमान (ENGvOMN) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या इंग्लंडसाठी हा सामना जिंकणे अनिवार्य होते. या अटीसाठीच्या परिस्थितीत त्यांनी आपला खेळ उंचावत 8 गडी राखून विजय संपादन केला. ओमानला केवळ 47 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर विजयी आव्हान केवळ 3.1 षटकात गाठण्यात त्यांना यश आले.
England get it done in Antigua 🇦🇬#T20WorldCup | #ENGvOMA | 📝 https://t.co/hrhtHZS64T pic.twitter.com/Jz4FbkIIvE
— ICC (@ICC) June 13, 2024
ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाला कोणत्याही परिस्थितीत मोठा विजय साकारणे आवश्यक होते. नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. मार्क वूड व जोफ्रा आर्चर या वेगवान जोडीने सुरुवातीपासूनच ओमानचा डाव स्थिर होऊ दिला नाही. दोघांनी प्रत्येकी तीन बळी टिपले. त्यानंतर फिरकीपटू आदिल रशिद याने उर्वरित चार बळी घेत ओमानचा डाव केवळ 47 धावांमध्ये संपवला.
या धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्ट याने पहिल्या दोन चेंडूवर षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. दुसऱ्या बाजूने जोस बटलर याने केवळ आठ चेंडूंमध्ये नाबाद 24 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडने फक्त 19 चेंडूंमध्ये विजयी लक्ष पार करत, सर्वात वेगवान धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम देखील केला. या मोठ्या विजयासह इंग्लंडची सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याची आशा अजून जिवंत आहे. त्यांनी तीन सामन्यात तीन गुण मिळवले असून, रनरेट स्कॉटलंडपेक्षा अधिक केला आहे. अखेरच्या सामन्यात मोठा विजय मिळवल्यास तसेच ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडला पराभूत केल्यास इंग्लंड सुपर 8 मध्ये प्रवेश करेल.
(T20 World Cup 2024 England Crush Oman Chase Complete In 3.1 Overs Rashid Wood Shines)
I am not real wonderful with English but I find this really easy to read .