Breaking News

तन्वी शर्मा आणि आयुष शेट्टी US Open 2025 Badminton च्या फायनलमध्ये

US OPEN 2025 BADMINTON
Photo Courtesy: X

US Open 2025 Badminton: अमेरिकेत सुरू असलेल्या युएस ओपन 2025 बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांची शानदार कामगिरी सुरू आहे. भारताचे युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी (Ayush Shetty) आणि तन्वी शर्मा (Tanvi Sharma) यांनी अनुक्रमे पुरुष व ‌महिला एकेरीच्या अंतिम फेरी धडक मारली. स्पर्धेचे अंतिम सामने 30 जून रोजी होतील. 

Tanvi Sharma And Ayush Shetty Into US Open 2025 Badminton Finals

केवळ सोळा वर्षांच्या असलेल्या तन्वीने उपांत्य सामन्यात युक्रेनच्या सातव्या मानांकित पोलिना बोहरोवा हिला 21-14, 21-16 असे केवळ 34 मिनिटात पराभूत केले. विशेष म्हणजे तन्वीला या स्पर्धेसाठी कोणतेही मानांकन नाही. अंतिम सामन्यात तिची लढत अमेरिकेच्या अव्वल मानांकित बिवेन झॅंग हिच्याशी होईल.

दुसऱ्या बाजूला पुरुष गटात चौथ्या मानांकित ‌आयुष शेट्टी याने मोठा उलटफेर करत, अव्वल मानांकित व आंतरराष्ट्रीय क्रमवारी सहाव्या क्रमांकावर असलेल्या चायनिज तैपईच्या चो-टीन-चेन याच्यावर मात केली. अंतिम सामन्यात तो कॅनडाच्या ब्रायन यंग याच्या विरुद्ध लढताना दिसेल. या स्पर्धेतील विजेत्याला 300 रेटिंग गुण मिळतील.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: T20 World Cup 2024 Triumph: वर्षपूर्ती टीम इंडियाच्या विश्वविजयाची, न विसरता येणाऱ्या आठवणींची