
Team India For Newzealand Test Series: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यान 16 ऑक्टोबर पासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मायदेशात होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ ही मालिका खेळेल. या मालिकेत अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा संघाचा उपकर्णधार असेल.
🚨NEWS 🚨#TeamIndia’s squad for @IDFCFIRSTBank Test series against New Zealand announced.
Details 🔽 #INDvNZ
— BCCI (@BCCI) October 11, 2024
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह: नितिशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मयंक यादव व प्रसिद्ध कृष्णा.
(Team India Squad For Test Series Against Newzealand)