Breaking News

TKR बनली CPL 2025 ची चॅम्पियन! 38 व्या वर्षीही पोलार्डचा जलवा कायम

cpl 2025
Photo Courtesy: X

TKR Won CPL 2025: कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच सीपीएल 2025 चा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी (22 सप्टेंबर) सकाळी पार पडला. या सामन्यात ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाने गयाना अमेझॉन वॉरियर्सचा 4 गडी राखून पराभव केला. हे त्यांचे पाचवे सीपीएल विजेतेपद ठरले. वयाच्या 38 व्या वर्षी देखील कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

गयाना येथे झालेल्या या सामन्यात नाईट रायडर्सच्या शिस्तबद्ध गोलंदाजी पुढे गयानाचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. सर्वच खेळाडूंच्या थोड्या थोड्या योगदानाने त्यांनी 130 पर्यंत मजल मारली. नाईट रायडर्ससाठी सौरभ नेत्रावळकर याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना नाईट रायडर्सने पोलार्डच्या 12 चेंडूतील 21 व अकिल होसेनच्या 7 चेंडूतील नाबाद 16 धावांच्या जोरावर विजेतेपद आपल्या नावे केले. पाच विजेतेपदासह टीकेआर स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनला आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: इकडे नबीने Dunith Wellalage ला 5 षटकार मारले, तिकडे वडिलांचे हार्ट अटॅकने निधन झाले