Vinesh Phogat Resign From Her Railway Job: भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने रेल्वेमधील आपल्या नोकरीचा राजीनामा (Vinesh Phogat) दिला असून, ती सक्रिय राजकारणात सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. ती लवकरच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करणार (Vinesh Phogat Join Congress) असून, आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक देखील लढवण्याची शक्यता आहे.
भारतीय रेलवे की सेवा मेरे जीवन का एक यादगार और गौरवपूर्ण समय रहा है।
जीवन के इस मोड़ पर मैंने स्वयं को रेलवे सेवा से पृथक करने का निर्णय लेते हुए अपना त्यागपत्र भारतीय रेलवे के सक्षम अधिकारियों को सौप दिया है। राष्ट्र की सेवा में रेलवे द्वारा मुझे दिये गये इस अवसर के लिए मैं… pic.twitter.com/HasXLH5vBP
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) September 6, 2024
पॅरिस ऑलिंपिक्समध्ये अंतिम फेरी गाठल्यानंतरही अतिरिक्त वजनामुळे तिच्यावर, विनापदक मायदेशात येण्याची नामुष्की ओढवली होती. असे असले तरी तिचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर ती राजकारणात येण्याच्या चर्चांना उधाण आलेले. नुकतीच तिने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर आता तिने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.
तिने राजीनामा देताना रेल्वेचे आपल्याला आतापर्यंत दिलेला संधीसाठी व मदतीसाठी आभार मानले. तिच्यासोबतच 2020 पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) हा देखील काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.
(Vinesh Phogat Resign From Her Railway Job)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।