![wcl 2024](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/07/irfan-wcl.jpg)
WCL 2024 Final: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) स्पर्धेचा अंतिम सामना इंडिया चॅम्पियन्स (India Champions) विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (INDCH vs PAKCH) असा खेळला गेला. पाकिस्तान संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 156 धावा उभ्या केल्या.
Target locked at 1️⃣5️⃣7️⃣
Let's chase this down! 🔥#INDvPAK #WorldChampionshipOfLegends #OnceAChampionAlwaysAChampion #WCLIndiaChampions pic.twitter.com/uQZavVUXk2
— WCL India Champions (@India_Champions) July 13, 2024
एजबॅस्टन येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कामरान अकमल व शारजिल खान संघाला चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत. विनय कुमार यांने खान याला दुसऱ्या षटकात बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मकसूदने आक्रमक 21 धावा केल्या. तर कामराने 24 धावांचे योगदान दिले. कर्णधार युनिस खान याचा इरफान पठाणने केवळ सात धावांवर त्रिफळा उडवला.
यानंतर शोएब मलिक व मिसबाह यांनी भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला. मिसबाह रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर मलिक देखील 41 धावा काढून तंबूत परतला. अखेर सोहेल तन्वीर (19) याने काही मोठे फटके मारत संघाला 156 पर्यंत पोहोचवले. भारतासाठी अनुरीत सिंग याने सर्वाधिक तीन बळी मिळविले.
(WCL 2024 Final Pakistan Champions Post 156 Against India Champions)