
When Vaibhav Suryavanshi Play For India? युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी हा सध्या क्रिकेटविश्वात चांगलाच चर्चिला जात आहे. सध्या सुरू असलेल्या एशिया कप रायझिंग स्टार्स (Asia Cup Rising Stars 2025) स्पर्धेत तो शानदार फॉर्ममध्ये दिसून आला. त्यानंतर आता त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा (Vaibhav Suryavanshi Coach Manish Ojha) यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
When Vaibhav Suryavanshi Play For India?
वैभव सूर्यवंशी व अभिषेक शर्मा हे लवकरच भारतीय टी20 संघासाठी खेळणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या मुद्यावर त्याचे प्रशिक्षक मनिष ओझा यांना विचारले असता ते म्हणाले, “सध्या वैभव इंडिया ए संघासाठी खेळतोय. हा भारताचा दुसरा वरिष्ठ संघ आहे. सध्या सुरू असलेल्या एशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील त्याची चांगली वरिष्ठ संघातील प्रवेशासाठी महत्त्वाची ठरेल.” पुढे बोलताना ते म्हणाले, “सध्या चालू असलेली ही स्पर्धा, आगामी अंडर 19 विश्वचषक व आयपीएल 2026 मधील कामगिरी ही त्याच्या भविष्यातील भारतीय संघातील प्रवेशासाठी निर्णायक ठरणार आहे.”
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: कोण आहे हा Kartik Sharma? आयपीएल लिलावाआधीच मार्केटमध्ये चाललंय नाव
केवळ 14 वर्षांच्या असलेल्या वैभवने आयपीएल 2025 मध्ये केवळ 35 चेंडूवर शतक झळकावले होते. एशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील पहिल्या सामन्यात 42 चेंडूवर 144 धावा ठोकल्या होत्या. यामध्ये 15 गगनचुंबी षटकार सामील होते. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही 161 च्या स्ट्राइक रेटने 45 धावा केल्या होत्या. ओमानविरूद्ध तो आणखी एक मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात असेल.
Latest Sports News In Marathi
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।