Breaking News

Wimbledon 2024: बार्बरा क्रेचिकोवा बनली विम्बल्डन 2024 ची सम्राज्ञी! पावलोनीचा संघर्ष ठरला अपयशी

Wimbledon 2024
Photo Courtesy: X/Wimbledon

Wimbledon 2024 Womens Singles Final: विम्बल्डन 2024 (Wimbledon 2024) महिला एकेरीचा अंतिम सामना (Wimbledon 2024 Womens Singles Final) शनिवारी (13 जुलै) खेळला गेला. चेक रिपब्लिकच्या बार्बरा क्रेचिकोवा (Barbora Krejcikova) हिने इटलीच्या जास्मिन पावलोनी (Jasmine Paolini) हिला पराभूत करत प्रथमच विम्बल्डन जिंकण्याचा कारनामा केला.

प्रथमच विम्बल्डन एकेरीची अंतिम लढत खेळत असलेल्या चेक रिपब्लिकच्या बार्बरा क्रेचिकोवा व इटलीची जास्मिन पावलोनी यांच्या दरम्यान या विजेतेपदासाठी चांगला संघर्ष झाला. 31 व्या मानांकित क्रेचिकोवाने 6-2 अशीच सुरुवात करत पहिला सेट जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर सातव्या मानांकित पावलोनीने 6-2 असे पुनरागमन केले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडू 3-3 अशा बरोबरीत होत्या. मात्र, त्यानंतर क्रेचिकोवाने पुढील दोन गेम जिंकत विजेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. पावलोनीने पुढील गेम जिंकत पराभव काही काळ लांबवला. मात्र, पुढचा गेम जिंकत क्रेचिकोवाने विजेतेपद आपल्या नावे केले.

(Wimbledon 2024 Barbora Krejcikova Won Womens Singles)

Wimbledon 2024: जोकोविच-अल्कारेझ भिडणार विम्बल्डनच्या गादीसाठी, मेदवेदेव पुन्हा अपयशी