Breaking News

WPL 2025 चे बिगुल शुक्रवारी वाजणार, वाचा सर्व संघांच्या खेळाडूंची यादी

WPL 2025
Photo Courtesy: X

WPL 2025 All Squads: महिला क्रिकेटमधील अव्वल फ्रॅंचायझी टी20 लीग असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग म्हणजेच डब्लूपीएल (WPL 2025) स्पर्धेचा तिसरा हंगाम शुक्रवारी (14 फेब्रुवारी) सुरू होत आहे. या स्पर्धेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, पहिला सामना गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) व गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्या दरम्यान होईल. यावेळी ही स्पर्धा चार वेगवेगळ्या शहरात खेळली जाणार आहे. 

WPL 2025 All Squads

स्पर्धेचा पहिला हंगाम मुंबईत खेळला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या हंगामातील सामने दिल्ली व बेंगळुरू येथे झालेले. यावेळी मुंबई, लखनऊ, वडोदरा व बेंगळुरू येथे सामने होतील. स्पर्धेचे पहिले विजेतेपद मुंबई इंडियन्सने तर दुसरे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पटकावलेले.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) – हरमनप्रीत कौर (कर्णधार), अक्षिता माहेश्वरी, पूजा वस्त्राकर, अमनदीप कौर, हायली मॅथ्यूज, सायका इशाक, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता, सजीवन सजना, एमेलिया कर, कीर्थना बालकृष्णन, संस्कृती गुप्ता, क्लो ट्रायॉन, शबनीम इस्माईल, नॅडिन डी क्लर्क, जी काहिलीने, नॅट सिव्हर-ब्रंट, यास्तिका भाटिया.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) – स्मृती मंधाना (Smriti Madhana), आशा शोभना जॉय, जोशिता वीजे, रिचा घोष, डॅनी व्याट, कनिका आहुजा, सब्बिनेनी मेघना, एकता बिश्त, श्रेयंका पाटील, एलिस पेरी, प्रेमा रावत, जॉर्जिया वेरेहम, राघवी बिश्त, चार्ली डीन, जाग्रवी पवार, हिदर ग्रॅहम, किम गार्थ, रेणुका सिंग.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) – मेग लेनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, मारिझान काप, ऍलिस कॅप्सी, नंदिनी कश्यप, जेस जॉनासन, मिनू मनी, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, राधा यादव, एनाबेल सदरलॅंड, सारा ब्रायस, टिटस साधू, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, निकी प्रसाद, श्री चरणी.

युपी वॉरियर्झ (UP Warriorz) – दीप्ती शर्मा (कर्णधार), उमा छेत्री, चिनल हेन्री, पुनम खेमनार, किरण नवगिरे, वृंदा दिनेश, चमारी अट्टापट्टू, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, सोफी एकलस्टोन, श्वेता सेहरावत, अंजली सरवनी, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर, आरुषी गोयल, क्रांती गौड, गौहर सुलताना.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

गुजरात जायंट्स (Gujarat Giants) – ऍश्ले गार्डनर (कर्णधार), बेथ मूनी, लॉरा वॉल्वर्ट, डिएंड्रा डॉटीन, फिबी लिचफिल्ड, डॅनी गिब्सन, डी हेमलता, हरलीन देओल, शबनम शकील, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, काश्वी गौतम, मन्नत कश्यप, भारती फुलमाळी, सायली सातघरे, सिमरन शेख व प्रकाशिका नाईक व मेघना सिंग.

WPL 2025 All Squads

अखेर बुमराहविनाच टीम इंडिया खेळणार Champions Trophy 2025, संघात दोन महत्त्वाचे बदल

Champions Trophy 2025 आधी ऑस्ट्रेलियाला जबर धक्का! पाच दिग्गज खेळाडूंची माघार, कॅप्टनही बदलला