
Wrestler Sushil Kumar Granted Bail: दोन वेळा ऑलिंपिक पदक मिळवणारा भारताचा कुस्तीपटू सुशील कुमार (Wrestler Sushil Kumar) याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. युवा कुस्तीपटू सागर धनकर ह’त्या प्रकरणात तो मे 2021 पासून तो तिहार कारागृहात होता. न्यायाधीश संजीव नरूला यांनी 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला.
Wrestler Sushil Kumar Granted Bail In Sagar Dhankar Murder Case
युवा राष्ट्रीय विजेता राहिलेल्या सागर धनकर याच्या ह’त्या प्रकरणात तब्बल 17 जणांवर आरोपाची निश्चिती करण्यात आली होती. मे 2021 पासून सुशील हा कैदेत होता. यापूर्वी 2023 मध्ये त्याला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी सात दिवसांचा अंतरिम जामीन मिळाला होता.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
सागर धनकर ह’त्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटल्याप्रमाणे, सागर याला संबंधितांनी खोलीमध्ये बंद करून हॉकी स्टिक व लाकडी दांडक्याने यांनी मारहाण केली होती. मृत सागर व त्याच्या इतर मित्रांना दिल्लीतील विविध ठिकाणी पकडत छत्रसाल स्टेडियम येथे आणण्यात आले होते. त्यानंतर सुरक्षारक्षकांना बाहेर काढून त्यांनी या तरुणांना मारहाण केलेली. जमीन खरेदी विक्री प्रकरणाने ही संपूर्ण घटना घडल्याचे स्पष्ट झालेले.
सुशील कुमार हा भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कुस्तीपटू मानला जातो. त्याने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावले होते. अशी कामगिरी करणारा तो भारताचा एकमेव कुस्तीपटू आहे.
(Wrestler Sushil Kumar Granted Bail In Sagar Dhankar Case)
Purandar Kesari 2025: यश वासवंड ठरला पुरंदर केसरीचा मानकरी! प्रसाद जगदाळे सलग दुसऱ्यांदा उपविजेता