WWE Clash Of The Castle 2024|डब्ल्यूडब्ल्यूईमधील (WWE) मानाच्या स्पर्धांपैकी एक असलेली डब्ल्यूडब्ल्यूई क्लॅश ऑफ द कॅसल 2024 (WWE Clash Of The Castle 2024) स्पर्धा 15 जून रोजी रंगणार आहे. स्कॉटलंड येथील ग्लासगो येथे या फाईट होतील. त्यातील पाच महत्त्वाच्या फाईटची घोषणा करण्यात आली आहे.
डब्ल्यूडब्ल्यूई स्मॅकडाउन (WWE SmackDown) या इव्हेंट चा भाग असलेल्या या स्पर्धेत सर्वात महत्त्वाची फाईट वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी (World Heavyweight Championship) होईल. डॅमियन प्रिस्ट (Damien Priest) याला ड्रू मॅकेन्टायर (Drew McIntyre) आव्हान देईल. डब्ल्यूडब्ल्यूई वुमन्स चॅम्पियन या किताबासाठी बेली (Bayley) समोर पायपर निवेन (Piper Niven) हिचे आव्हान असणार आहे.
It's going down in Scotland! @ArcherOfInfamy will defend his World Heavyweight Championship against @DMcIntyreWWE at #WWECastle!
🎟️ TICKETS ON SALE NOW: https://t.co/OZs5PK3nkd pic.twitter.com/zUpxoznkPI
— WWE (@WWE) May 25, 2024
डब्ल्यूडब्ल्यूई इंटरकॉन्टिनेन्टल चॅम्पियनशिप (WWE Intercontinental Championship) बेल्टसाठी सॅमी झियान (Sami Zyan) याच्यापुढे चॅड गॅबल (Chad Gable) उभा असणार आहे. कोडी रोड्स (Cody Rhodes) याला एजे स्टाईल्स (AJ Styles) आय क्विट (I Quit Match) सामन्यात आव्हान देईल. या सामन्यात अनडिस्पुटेड डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियनशिप (WWE Undisputed Championship) दावावर असेल.
वुमेन्स ट्रिपल थ्रेट टॅग टीम मॅच (Womens Triple Threat Tag Team Match) मध्ये बियांका बेलेर-जेड कारगील, अल्बा फायर-इस्ला डॉन व शायना बाझलर-झोए स्टार्क लढतील. या फाईट मधील विजेत्यांना वुमेन्स टॅग टीम चॅम्पियनशिप (WWE Womens Tag Team Championship) देण्यात येईल.
(WWE Clash Of The Castle 2024 Five Fights Announced)