
Yograj Singh Match Fixing Allegation On Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना जगभरात आदराने पाहिले जाते. मात्र, आता त्यांच्याविषयी एकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले व माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी खळबळजनक दावा केला आहे. यामध्ये त्यांनी थेट कपिल देव यांना मॅच फिक्सर असे संबोधले.
Yograj Singh Match Fixing Allegation On Kapil Dev
एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना योगराज सिंग म्हणाले, “त्यावेळच्या सर्व पत्रकारांना माहित आहे की, 1997 मॅच फिक्सिंग प्रकरणाची फाईल का बंद केली गेली. त्यामध्ये कोण गुंतले होते, हे देखील माहित आहे. सर्वात आधी कपिल देव मग मोहम्मद अझरुद्दीन व त्यानंतर इतर खेळाडूंचा समावेश होता. मात्र, अनेक मोठ्या नावांच्या प्रतिष्ठेचा विषय बनला असता म्हणून, ही फाईल सुप्रीम कोर्टाकडून बंद केली गेली.”
माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांच्या खुलाशानंतर 1997 मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरण समोर आले होते. त्यावेळी कपिल यांनी मनोज प्रभाकर यांना पैसे देऊन खराब खेळण्यास सांगितल्याचे म्हटले गेलेले. मात्र, अखेर सीबीआयने पूर्ण चौकशी अंती कपिल देव यांना क्लीन चिट दिलेली. परंतु, मोहम्मद अझरुद्दीन, मनोज प्रभाकर, नयन मोंगिया, अजय शर्मा व अजय जडेजा या खेळाडूंना या प्रकरणाचा आपली कारकीर्द संपवावी लागली.
याच मुलाखतीत योगराज यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्यावर देखील निशाणा साधला. धोनीने अनेक वरिष्ठ खेळाडूंची कारकीर्द अकाली संपवल्याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला.
(Latest Sports News In Marathi)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Asia Cup 2025 च्या भारत-पाकिस्तान सामन्यात हाऊसफुल नसणार स्टेडियम? कारण काय?