![YUZVENDRA CHAHAL](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/12/YUZVENDRA-CHAHAL-DHANASHREE.jpg)
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Sepreted: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याचा घटस्फोट झाला असल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत. पत्नी धनश्री वर्मा (Dhanshree Verma) व चहल मागील अनेक दिवसांपासून सोबत नसल्याचे, सांगण्यात येत आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस 22 डिसेंबर रोजी होता. मात्र, दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या नाहीत. तसेच, त्यानंतर चहलने सोशल मीडियावर काही गूढ पोस्ट केल्याने, या बातमीला बळ मिळाल्याचे दिसून येते.
Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Sepreted Rumours
धनश्री व चहल यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवशी कोणतीही सोशल मीडिया पोस्ट अथवा स्टोरी शेअर केली नाही. तसेच, मागील अनेक महिन्यांपासून दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला नसल्याचे त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून स्पष्टपणे दिसून येते. यादरम्यान दोघेही आपल्या वेगवेगळ्या मित्र-मैत्रिणींसोबत दिसत आहेत.
या सर्व गोष्टींसोबतच चहल याने आपल्या इंस्टाग्राम हँडल वरून काही स्टोरी शेअर केल्या होत्या. यामध्ये एका स्टोरीत त्याने ‘अंत अस्ती प्रारंभ’ म्हणजेच शेवटानंतर नवी सुरुवात, असे लिहिले होते. अन्य एका स्टोरीमध्ये त्याने, ‘एकटे व्हा, एकटेपणाची मजा घ्या आणि शांतीत सुधारणा करा’ असे लिहिलेले दिसून आले. यामुळेच तो आणि धनश्री सध्या एकत्र नसल्याचे बोलले जाते. अभिनेता कमाल आर खान याने देखील ते वेगळे झाल्याचे एक्स पोस्ट करत सांगितले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
चहल व धनश्री यांनी चार वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे बोलले जात होते. धनश्री हिचे नाव भारताचाच क्रिकेटपटू श्रेयस अय्यर यांच्याशी जोडले जाते. धनश्री ही व्यवसायाने कोरिओग्राफर व अभिनेत्री आहे. दुसरीकडे, चहल सध्या भारतीय संघातून बाहेर असून, आपल्या पुनरागमनासाठी प्रयत्न करतोय. नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात त्याच्यावर पंजाब किंग्स संघाने तब्बल 18 कोटींची बोली लावली होती. तत्पूर्वी, तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता.
(Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Sepreted Rumours)
बहुप्रतिक्षित Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर, पाहा टीम इंडिया कुठे आणि कधी खेळणार?