Dinesh Karthik LBW Controversy| आयपीएल 2024 मध्ये बुधवारी (22 मे) एलिमिनेटरचा महत्त्वपूर्ण सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी (RRvRCB) अशा झालेल्या या महत्त्वपूर्ण सामन्यात राजस्थानसमोर 173 धावांचे लक्ष ठेवले गेले. मात्र, आरसीबी संघ प्रथम फलंदाजी करत असताना दिनेश कार्तिक याला नाबाद ठरवण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला.
आरसीबी फलंदाजी करत असताना डावाच्या पंधराव्या षटकात काहीसा वाद निर्माण झाला. आवेश खान गोलंदाजी करत असताना त्याचा चेंडू फलंदाजी करत असलेल्या दिनेश कार्तिकच्या पॅडवर लागला. त्यावर राजस्थानच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले व पंचांनी कार्तिकला बाद ठरवले. मात्र, त्याने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली व तिसऱ्या पंचांनी फारसा वेळ न घेता त्याला नाबाद ठरवले. यानंतर राजस्थानचे खेळाडू व मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा निराश झाल्याचे दिसले.
रिप्लेमध्ये चेंडू कार्तिकच्या पॅडला लागला होता तर त्याची बॅट पॅडला लागल्याचे दिसत होते. त्यामुळेच समालोचन करत असलेल्या अनेक दिग्गजांचा देखील पारा चढला.
Kevin Pietersen said "I don't think umpire has got the decision right". pic.twitter.com/tM9xalElK4
— Johns. (@CricCrazyJohns) May 22, 2024
केविन पीटरसन याने स्पष्ट शब्दात “पंचांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे असे म्हटले.”
तर सुनील गावसकर यांनी म्हटले,
“बॅट पॅडला लागली होती. बॉल बॅटला लागला नव्हता.”
The bat hit the pad .. that was OUT .. #IPL .. Shocking decision ..
— Michael Vaughan (@MichaelVaughan) May 22, 2024
या व्यतिरिक्त मायकल वॉन यांनी देखील ट्विट करत हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले.
या संपूर्ण हंगामात अशा प्रकारचे अनेक चुकीचे निर्णय तिसऱ्या पंचांनी दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंनी पुढील हंगामात हॉटस्पॉट वापरण्यात यावे, अशी मागणी केली आहे .
(Dinesh Karthik LBW Controversy Sunil Gavaskar Pietersen Gets Angry)