Breaking News

धोनीने अचानक का दिली Ruturaj Gaikwad कडे कॅप्टन्सी? CSK च्या CEO नी केला मोठा खुलासा

ruturaj gaikwad
Photo Courtesy: X

Ruturaj Gaikwad: चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएल 2024 च्या साखळी फेरीतून बाहेर पडला आहे. गतविजेत्या असलेल्या चेन्नईला अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आल्याने, त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली. हा हंगाम सुरू होण्याच्या एक दिवस आधीच एमएस धोनी (MS Dhoni) याने‌ ऋतुराज गायकवाड ‌(Ruturaj Gaikwad) याच्याकडे नेतृत्व सोपवले होते. त्याने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता थेट सीएसकेच्या सीईओंनी याबाबत खुलासा केला आहे.

एमएस धोनी याने तब्बल 15 हंगाम सीएसकेचे नेतृत्व केले. त्यापैकी 2022 हंगामात रवींद्र जडेजा याच्याकडे नेतृत्व दिले गेले होते. मात्र, संघाच्या खराब कामगिरीनंतर स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुन्हा धोनी कर्णधार आला. तत्पूर्वी, सीएसके संघाला आयपीएल 2016 व 2017 मध्ये निलंबित केले गेले होते. त्यानंतर आता ऋतुराज संपूर्ण हंगामात नेतृत्व करणारा सीएसकेचा फक्त दुसरा कर्णधार बनला. त्याच्याकडे नेतृत्व कसे दिले याबाबत बोलताना सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ म्हणाले,

“या निर्णयाबाबत फारसे कोणाला माहीत नव्हते. आम्हालाही याची कल्पना नव्हती. धोनीने ज्यावेळी आम्हाला हा निर्णय सांगितला तेव्हा आम्ही त्याला पाठबळच दिले. त्याला ऋतुराजवर आत्मविश्वास होता. तो कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्याने आम्हाला दिला. धोनीचे पूर्ण सहकार्य असल्याने आम्हालाही या निर्णयावर काही आपत्ती नव्हती.”

आपल्या पहिल्याच हंगामात ऋतुराज याने कर्णधार म्हणून आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नेतृत्वात संघाने सात विजय मिळवले तर सात पराभव त्यांना पाहावे लागले. आयपीएल इतिहासात केवळ तिसऱ्यांदा ते प्ले ऑफ्समध्ये पोहोचू शकले नाहीत.

(CSK CEO Tell Story Behind How Ruturaj Become Captain)

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

One comment

  1. Awesome! Its genuinely remarkable post, I have got much clear idea regarding from this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *