Breaking News

MPL 2024 चे टाइमटेबल आले! गहुंजेवर रंगणार 34 सामन्यांचा थरार

MPL 2024
Photo Courtesy” X/MPL

महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (Maharashtra Premier League) दुसऱ्या हंगामाचे (MPL 2024) वेळापत्रक समोर आले आहे. यंदा हंगामाला दोन जूनपासून सुरुवात होईल. स्पर्धेत ती साखळी व चार प्ले ऑफ सामने खेळले जातील. सर्व सामने गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (MCA Stadium) खेळले जाते. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना गतविजेते रत्नागिरी जेट्स विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्या दरम्यान खेळला जाईल.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांची कल्पना असलेल्या या स्पर्धेला पहिल्या वर्षी तुफान प्रतिसाद लाभला होता. प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश दिल्याने अनेक प्रेक्षक मैदानापर्यंत पोहोचले होते. ऋतुराज गायकवाड, केदार जाधव व राहुल त्रिपाठी यासारख्या महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.‌ यंदा देखील ऋतुराज व केदार या स्पर्धेत खेळताना दिसतील. यंदा स्पर्धेचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा व स्पोर्ट 18 वर होईल.

मागील वर्षी अंतिम सामना खेळलेले रत्नागिरी व कोल्हापूर या वर्षी पहिला सामना खेळतील. 2 जून रोजी हा सामना खेळला जाईल.‌ 29 सामन्यांपैकी 13 सामने हे दुपारच्या सत्रात म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून खेळले जातील. तर प्ले ऑफ्ससह इतर सामने सायंकाळी 7 वाजता सुरू होतील. अंतिम सामना 22 जून रोजी खेळला जाईल.

(MPL 2024 Schedule Out Ruturaj Gaikwad Kedar Jadhav Play At MCA Stadium)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *