Breaking News

IPL 2024 Final| SRH ला भरारी घेऊन देणारे कॅप्टन कमिन्सचे 5 शिलेदार

IPL 2024 Final|आयपीएल 2024 चा अंतिम सामना रविवारी (26 मे) खेळला जाईल. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर राहिलेले कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) हे या महामुकाबल्यात भिडणार आहेत. मागील हंगामात अखेरच्या स्थानी राहिलेल्या सनरायझर्स हैदराबादने यंदा थेट फायनलपर्यंत मुसंडी मारत सर्वांना चकित केले. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच हैदराबादचे नेतृत्व करणाऱ्या पॅट कमिन्स याचा यामध्ये विशेष वाटा राहिला आहे. त्याच्यासोबतच हैदराबादला इथपर्यंत मजल मारून देणाऱ्या आणखी पाच शिलेदारांबाबत आपण जाणून घेऊया.

ट्रेविस हेड (Travis Head)- हैदराबादच्या यशात सर्वाधिक वाटा त्यांचा सलामीवीर ट्रेविस हेड याचा राहिला आहे. मागील वर्षी वनडे विश्वचषक गाजवल्यानंतर त्याला हैदराबादने आपल्या संघात संधी दिली. दरवेळी संघाला आक्रमक सलामी देण्यात तो यशस्वी ठरला. त्याने 14 सामन्यात 43 पेक्षा जास्तच्या सरासरीने 567 धावा केल्या. यामध्ये एक शतक व चार अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याचा स्ट्राईक रेट देखील 192 इतका जबरदस्त राहिला.

अभिषेक शर्मा (Abhishek Sharma)- हेड प्रमाणेच अभिषेक शर्मा या युवा भारतीय अष्टपैलूने देखील हैदराबादच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. सलामीवीर असलेल्या अभिषेक याने आतापर्यं

ipl 2024 final
Photo Courtesy: X/SRH

त हंगामात एकदाही 30 पेक्षा जास्त चेंडू न खेळता 207 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 482 धावा कुटल्या आहेत. तसेच क्वालिफायर दोनच्या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने गोलंदाजीत चुणूक दाखवत दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवले होते.

टी नटराजन (T Natrajan)- हंगामाच्या सुरुवातीला संघातील जागेवरच प्रश्नचिन्ह असलेल्या टी नटराजन याने गोलंदाजी विभागात संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 8.83 च्या इकॉनोमी रेटने 13 सामन्यात 19 बळी टिपले आहेत. अंतिम सामन्यात बळींचा पंजा मिळवल्यास तो थेट पर्पल कॅप जिंकू शकतो.

पॅट कमिन्स (Pat Cummins)- संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने यावर्षी खऱ्या अर्थाने हैदराबाद संघाचे नशीब पालटले. विश्वचषक विजेता कर्णधार असलेल्या कमिन्सने आपल्या नेतृत्वाची झलक दाखवत संघाला अंतिम फेरीत नेले. त्याचबरोबर गोलंदाजीतही तो आपली जबाबदारी विसरला नाही व आत्तापर्यंत 17 बळी टिपण्यात यशस्वी ठरला.

हेन्रिक क्लासेन (Heinrich Klassen)- मागील हंगामापासून या हंगामापर्यंत सनरायझर्स हैदराबादच्या ज्या खेळाडूने सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली तो म्हणजे यष्टिरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेन. मधल्या फळीत संघाला जेव्हा गरज पडली त्यावेळी क्लासेन उभा राहिला. त्याने आपली आक्रमकता व जबाबदारी यांची सुरेख सांगड घालत 15 सामन्यात 173 च्या स्ट्राईक रेटने 463 धावा जमवल्या आहेत. अंतिम फेरीत पुन्हा एकदा संघाला त्याच्याकडून अपेक्षा असतील.

(IPL 2024 Final Five Key Players Who Drive SRH Towards Final Journy)

7 comments

  1. Woh I like your blog posts, saved to my bookmarks! .

  2. Write more, thats all I have to say. Literally, it seems as though you relied on the video to make your point. You definitely know what youre talking about, why throw away your intelligence on just posting videos to your weblog when you could be giving us something enlightening to read?

  3. Heya i’m for the first time here. I came across this board and I in finding It really useful & it helped me out a lot. I’m hoping to provide one thing back and aid others like you helped me.

  4. I like what you guys are up too. Such smart work and reporting! Keep up the excellent works guys I have incorporated you guys to my blogroll. I think it’ll improve the value of my site 🙂

  5. I like this post, enjoyed this one thankyou for putting up.

  6. Well I sincerely enjoyed studying it. This subject offered by you is very helpful for good planning.

  7. I’m extremely impressed with your writing skills as well as with the layout on your weblog. Is this a paid theme or did you modify it yourself? Either way keep up the nice quality writing, it is rare to see a great blog like this one today..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *