Breaking News

नॉर्किएचा नादखुळा! टाकला T20 World Cup इतिहासातील सर्वात भयानक स्पेल, श्रीलंकन फलंदाजाची उडाली त्रेधातिरपीट

anrich nortje
Photo Courtesy: X/ICC

Anrich Nortje Spell In T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मधील चौथा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका (SAvSL) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी श्रीलंका संघाला अवघ्या 77 धावांवर रोखले. अनुभवी वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए (Anrich Nortje) याने अत्यंत जबरदस्त स्पेल टाकत गोलंदाजीचे नेतृत्व केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय श्रीलंकेने घेतला होता. मात्र, त्यांचा हा निर्णय सपशेल चुकला. बार्टमनने पहिला बळी मिळवल्यानंतर, नॉर्किएने आपल्या टी20 कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पेल टाकला. त्याने कुसल मेंडिस, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका व ऍंजेलो मॅथ्यूज या प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने आपल्या चार षटकांमध्ये केवळ सात धावा देऊन हे चार गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाकडून टी20 क्रिकेटमध्ये टाकला गेलेला हा सर्वोत्तम स्पेल ठरला.

नॉर्किए हा आपला तिसरा टी20 विश्वचषक खेळत आहे. त्याने आतापर्यंत विश्वचषकात फक्त 11 सामने खेळताना 24 गडी बाद केले. सर्वात कमी सामन्यात अशी कामगिरी करणारा तो गोलंदाज ठरला. तसेच टी20 विश्वचषकात सर्वाधिक वेळा तीन बळी मिळवण्याच्या बाबतीत त्याने सईद अजमल व शाकिब अल हसन यांची बरोबरी केली.

या सामन्यात नॉर्किए व्यतिरिक्त केशव महाराज व कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर, बार्टमन एक बळी घेण्यात यशस्वी ठरला.

(Anrich Nortje Spell In T20 World Cup Against Srilanka)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *