Breaking News

‘चला जनावरांनो…’, पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यावर दिग्गजाचे वादग्रस्त ट्विट व्हायरल

mohammad hafeez tweet
Photo Courtesy: X/PCB

Mohammad Hafeez Tweet|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेतून पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) बाहेर पडला आहे. मागील विश्वचषकातील उपविजेता असलेल्या पाकिस्तानवर ही नामुष्की सलग दोन पराभवामुळे आली. त्यानंतर आता संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे‌. पाकिस्तानचा माजी कर्णधार तसेच माजी प्रशिक्षक मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) याने केलेल्या ट्विटमुळे वाद निर्माण झाला.

या विश्वचषकात पाकिस्तान संघ चांगल्या तयारीने आला होता. मात्र, त्यांना पहिल्याच सामन्यात यूएसएने पराभूत करून खळबळ उडाली. त्यानंतर भारताने देखील त्यांच्यावर विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात त्यांनी कॅनडावर मात केली. मात्र, यूएसए विरुद्ध आयर्लंड हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने युएसएला एक गुण मिळाला. त्यामुळे आता पाकिस्तान अखेरच्या सामन्यात विजय मिळवला तरी केवळ चार गुणांपर्यंत पोहोचू शकतो. तरी असे पाच गुणांसह सुपर 8 मध्ये दाखल झाला.

यूएसएसारख्या दुबळ्या संघाकडून पराभूत झाल्याने, तसेच भारताविरुद्ध 120 धावांचा पाठलाग करण्यात अपयश आल्याने संघावर मोठी टीका होतेय. पाकिस्तानचा माजी कर्णधार तसेच काहीकाळ मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या मोहम्मद हाफिज याने ट्विट करत म्हटले,

‘कुर्बानी के जानवर हाजिर हो’

कोणत्याही मोठ्या स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघ व्यवस्थापनात तसेच संघात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येतात. त्यामुळे हाफिज याने यावेळी कोणाला जबाबदार धरले जाते, या अनुषंगाने हे ट्विट केले.

या विश्वचषकात बाबर आझम याच्या नेतृत्वावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला जात आहे. तसेच त्याच्या संथ फलंदाजीमुळे त्याला टी20 संघातून वगळावे अशी देखील मागणी होतेय.

(Mohammad Hafeez Tweet Goes Viral After Pakistan Exclusion From T20 World Cup 2024)

T20 World Cup : सुपर 8 फेरी गाठत अमेरिकेचा ‘डबल धमाका’, टी20 विश्वचषक 2026 मध्ये थेट प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *