Harris Rauf Viral Video : टी20 विश्वचषक 2024च्या साखळी फेरीच्या टप्प्यातूनच बाहेर पडल्याने पाकिस्तान क्रिकेट संघाला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस राउफ (Pakistani Bowler Harris Rauf) याचा सामना एका चाहत्याशी झाला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि हरिसला राग अनावर झाल्याने तो चाहत्याच्या अंगावर धावून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेमके कोणत्या कारणामुळे दोघांमुळे बाचाबाची झाली?, जाणून घेऊया..
हरिसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हरिस रऊफ हॉटेल जवळ पत्नीसोबत फिरत होता. तेव्हा तिथे काही क्रिकेट चाहते होते. यावेळी त्याने हरिस रऊफवर काहीतरी प्रतिक्रिया केली. त्यानंतर हारिस रऊफ अंगावर धावत गेला. त्याला त्याच्या पत्नीने रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण तिला बाजूला ढकलून चप्पल काढून चाहत्यांच्या अंगावर धावून जातो. रस्त्याने चालणाऱ्या काही व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Haris Rauf Fight
His wife tried to stop her.
Haris- Ye indian ho hoga
Guy- Pakistani hu @GaurangBhardwa1 pic.twitter.com/kGzvotDeiA— Maghdhira (@bsushant__) June 18, 2024
हा व्हिडीओ काळजीपूर्वक ऐकला तर एका फोटोवरून हे भांडण झाल्याचे स्पष्ट होते. या व्हिडीओमध्ये हरिससोबतच्या भांडणाच्या वेळी हा चाहता म्हणतो, ‘मी फक्त एक सेल्फी मागितला होता.’ यानंतर हरिस म्हणतो, ‘तू तुझ्या बापाला शिव्या देत आहेस. हा तुमचा भारत नाही.’
हरिस राउफचे टी20 विश्वचषकातील प्रदर्शन
दरम्यान हरिस राउफचे टी20 विश्वचषक 2024 मधील प्रदर्शन चांगले राहिले. त्याने 4 सामन्यात 6.73 च्या इकोनॉमी रेटने 7 विकेट्स काढल्या. यादरम्यान 21 धावांवर 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.