Breaking News

WCL 2024: रॉबी-युवीनंतर पठाण ब्रदर्सने दाखवली पॉवर! इंडिया चॅम्पियन्सचे ऑस्ट्रेलियासमोर 255 धावांचे आव्हान, पाहा स्कोरकार्ड

wcl 2024
Photo Courtesy: X

WCL 2024: इंग्लंड येथे खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (डब्लूसीएल 2024) स्पर्धेत दुसरा उपांत्य फेरीचा सामना इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स (INDCH vs AUSCH) असा खेळला गेला. भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 255 धावांचे आव्हान ठेवले.

नाणेफेक गमावल्यानंतर युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या नेतृत्वातील इंडिया चॅम्पियन्स (India Champions) संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. अंबाती रायुडू व सुरेश रैना लवकर बाद झाल्यानंतर रॉबीन उथप्पा याने शानदार फलंदाजी करताना 35 चेंडूंमध्ये 65 धावांची शानदार खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या युवराज सिंग याने आपला जुना अंदाज दाखवताना 28 चेंडूंमध्ये चार चौकार व पाच षटकारांच्या मदतीने 59 धावा चोपल्या.

अखेरच्या चार षटकांमध्ये युसुफ पठाण (Yusuf Pathan) व इरफान पठाण (Irfan Pathan) या बंधूंनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमण केले. इरफानने केवळ 19 चेंडूंमध्ये 50 धावांची वादळी खेळी केली. तर, युसुफने अखेरपर्यंत नाबाद राहत 23 चेंडूंमध्ये नाबाद 51 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी पीटर सीडलने सर्वाधिक 4 बळी मिळवले.

या सामन्यातील विजेता संघ पाकिस्तान चॅम्पियन संघाशी अंतिम फेरीत लढेल.

(wcl 2024 India Champions post 254 against Australia champions pathan brothers Shines)