![duleep trophy 2024](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/09/duleep-trophy-ind-ban.jpg)
Duleep Trophy 2024: देशांतर्गत क्रिकेट हंगामामधील पहिली स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे सामने समाप्त भारत ब संघाने भारत अ संघाचा (INDA v INDB) 76 धावांनी पराभव केला. तर, भारत क संघाने भारत ड (INDC v INDD) संघावर चार गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेचे आगामी बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी (INDvBAN) महत्त्व होते. आता पहिल्या फेरीच्या सामन्यानंतर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील स्थान जवळपास पक्के मानले जात आहेत.
रिषभ पंत (Rishabh Pant)- अपघातानंतर प्रथमच प्रथमश्रेणी सामना खेळत असलेल्या रिषभ पंत याने भारत ब संघासाठी केलेल्या कामगिरीमुळे बांगलादेशविरुद्ध त्याची निवड पक्की मानली जात आहे. पहिला डावात केवळ सात धावा केल्यानंतर, दुसऱ्या डावात फलंदाजीला प्रतिकूल असलेल्या खेळपट्टीवर त्याने वेगवान अर्धशतक केले. त्याने केवळ 47 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या. त्याच्यासोबतच ध्रुव जुरेल हा त्याचा नजीकचा प्रतिस्पर्धी हा अपयशी ठरल्याने, रिषभ यष्टीरक्षक म्हणून भारतीय कसोटी संघात पुनरागमन करू शकतो.
केएल राहुल (KL Rahul)- मधल्या फळीतील पाचव्या क्रमांकाच्या जागेसाठी भारतीय संघात मोठी स्पर्धा दिसून येते. केएल राहुल, सर्फराज खान व श्रेयस अय्यर यांच्या त्या जागेसाठी रस्सीखेच होती. मात्र, राहुल याने आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर दोन्ही डावात चांगली सुरुवात केली. दुसऱ्या डावात त्यांनी एकाकी झुंज देताना 56 धावांची खेळी केली. दुसरीकडे सर्फराज व श्रेयस यांनी आक्रमक खेळ दाखवला असला तरी, या जागेसाठी पहिली पसंती राहुल असू शकतो.
आकाश दीप (Akash Deep)- जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज भारताच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व बांगलादेशविरुद्ध करेल. अंतिम 11 मध्ये दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून आकाश दीप याने आपली जागा निश्चित केल्याचे दिसून येते. त्याने भारत अ संघासाठी पहिल्या डावात चार तर दुसऱ्या डावात पाच बळी मिळवले. मुकेश कुमार व इतर युवा वेगवान गोलंदाज तितके प्रभावी न ठरल्याने, आकाश बांगलादेशविरुद्ध खेळताना दिसेल.
(Duleep Trophy 2024 This Three Players Secured Place Against Bangladesh)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।