IND v BAN T20I Preview: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला रविवारी (6 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. ग्वालियर येथील नवीन माधवराव सिंधिया स्टेडियम येथे हा सामना रंगेल. पहिल्या सामन्यात विजय मिळवून, आघाडी घेण्याचा प्रयत्न सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ करेल.
नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 असा सहज विजय मिळवला. त्यानंतर आता टी20 मालिकेतील पहिला सामना रविवारी खेळला जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक युवा चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. आधी संघात निवड झालेला अष्टपैलू शिवम दुबे हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी तिलक वर्मा याला संधी मिळाली आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने आधीच जाहीर केल्याप्रमाणे, अभिषेक शर्मा व संजू सॅमसन (Sanju Samson) हे डावाची सुरुवात करतील. मधल्या फळीत स्वतः सूर्यकुमार, अष्टपैलू रियान पराग व पुनरागमन करत असलेला अनुभवी हार्दिक पांड्या दिसेल. तसेच फिनिशर म्हणून जबाबदारी रिंकू सिंग याच्या खांद्यावर असणार आहे.
🚨 NEWS 🚨
Shivam Dube ruled out of #INDvBAN T20I series.
The Senior Selection Committee has named Tilak Varma as Shivam’s replacement.
Details 🔽 #TeamIndia | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 5, 2024
आयपीएल 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेला नितिशकुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy Debut) हा या सामन्यात पदार्पण करू शकतो. फिरकी गोलंदाजीची धुरा पुन्हा एकदा रवी बिश्नोई सांभाळताना दिसू शकतो. त्याच्या जोडीला बऱ्याच कालावधीनंतर संघात स्थान मिळालेला वरूण चक्रवर्ती दिसण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंग याच्यासोबत हर्षित राणा (Harshit Rana Debut) किंवा मयंक यादव (Mayank Yadav Debut) ज्यांच्या पैकी एकाला पदार्पणाची संधी मिळू शकते.
बांगलादेश संघाच्या फलंदाजीची मदार प्रामुख्याने कर्णधार शांतो, लिटन दास, महमदुल्लाह व तौहिद हृदय यांच्यावर असेल. अष्टपैलू मेहदी हसन मिराज हा संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वेगवान गोलंदाजीत अनुभवी मुस्तफिजूर रहमान व शोरिफुल इस्लाम हे संघात पुनरागमन करतील. टी20 विश्वचषकात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न बांगलादेश संघ करेल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
मालिकेतील दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियम येथे खेळला जाईल. तर तिसरा आणि अखेरचा सामना 12 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियम येथे होणार आहे. या मालिकेचे प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 व जीओ सिनेमा येथे केले जाईल.
(IND v BAN T20I Preview Suryakumar Confirm Sanju Samson As Opener)
हे देखील वाचा: तब्बल 27 वर्षांनी Irani Trophy मुंबईकडे! रहाणेच्या नेतृत्वात संपला विजेतेपदाचा दुष्काळ
Ajinkya Rahane: ‘अजिंक्य’ नाव सार्थ करतोय रहाणे! कॅप्टन म्हणून उंचावली 5 वी ट्रॉफी, आता ती एकच बाकी
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।